'पीएम मोदींना माझ्या वडिलांनी विनम्रपणे नकार दिला'

supriya sule
supriya sule

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या बैठकीची सध्या देशाच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. या मुलाखतीत काय झालं? हे खुद्द शरद पवार यांनी काल एका टीव्ही चॅनेलच्या मुलाखतीत स्पष्ट केलंय. पण, अजूनही त्या मुलाखतीवर चर्चा सुरूच आहे. त्या मुलाखतीविषयी आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माहिती दिलीय. माझ्या वडिलांनी पंतप्रधान मोदींना विनम्रपण नकार दिला, असं सुप्रिया सुळेंनी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलंय. 

शरद पवार काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात सत्ता स्थापनेविषयी चर्चा सुरू असतानाच ही भेट झाली होती. त्यामुळं राजकीय वर्तुळात संभ्रम निर्माण झाला होता. त्यानंतर अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी करून उपमुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली होती. या सगळ्या घडामोडी इतिहास जमा झाल्या. पण, शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यात काय चर्चा झाली. त्यांच्यात सत्ता स्थापनेविषयी चर्चा झाली का? याविषयी सगळ्यांनाच उत्सुकता होती. त्यावर काल शरद पवार यांनी मुलाखतीमध्ये पडदा टाकला. 'पंतप्रधान मोदींनी मला तुमच्यासोबत काम करायला आवडेल, तसेच सुप्रिया सुळे यांच्यासारख्या नेत्या केंद्रात चांगली जबादारी घेऊ शकतात.' अशी ऑफर पंतप्रधान मोदींनी दिल्याचं शरद पवार यांनी काल मुलाखतीत सांगितलं होतं.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
एनडीटीव्ही या वृत्तसमूहाला दिलेल्या मुलाखतीत सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उदारता दाखवली होती. पण, माझ्या वडिलांनी अतिशय नम्रपणे नकार दिला होता. मुळात त्यांच्या बैठकीला मी उपस्थित नव्हते. ती बैठक दोन वरिष्ठ नेत्यांमध्ये होती. पंतप्रधान मोदींचे ते औदार्य होतं की, त्यांनी असा प्रस्ताव दिला. मुळात महाराष्ट्राचं राजकारण वेगळं आहे. महाराष्ट्रात व्यक्तिगत संबंधांना खूप महत्त्व आहे. जरी वैचारिक मतभेद असले तरी, संबंध खूप महत्त्वाचे असतात. तुम्ही पवारसाहेबांना ऐकलं असेल की त्यांनी काय सांगितलं. त्यांनी अतिशय नम्रपणे नकार दिला. शरद पवार हे केवळ माझे वडीलच नाही तर, बॉसही आहेत. तुम्हाला माहितीच आहे की, बॉस इज ऑलवेज् राईट असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com