esakal | मनसे आमदार उद्धव ठाकरेंना म्हणतात, 'आता ‘U’ ‘T’urn नको!'
sakal

बोलून बातमी शोधा

MNS MLA Raju Patil tag CM Uddhav Thackeray in tweet about bullet train

मनसेचे आमदार राजू पाटील बहुमत चाचणीवेळी तटस्थ राहिले असले, तरी त्यांनी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ट्विट करत एका गोष्टीची आठवण करून दिली आहे.

मनसे आमदार उद्धव ठाकरेंना म्हणतात, 'आता ‘U’ ‘T’urn नको!'

sakal_logo
By
टीम ईसकाळ

मुंबई : मनसेचे आमदार राजू पाटील बहुमत चाचणीवेळी तटस्थ राहिले असले, तरी त्यांनी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ट्विट करत एका गोष्टीची आठवण करून दिली आहे. सध्या उद्धव ठाकरे अनेक महत्त्वाचे निर्णय घेताना दिसत आहेत. आरेमधील मेट्रो कारशेडचे काम त्यांनी स्थगित केले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्त्वाकांक्षी अशा बुलेट ट्रेनबाबतही उद्धव ठाकरे महत्त्वाचे निर्णय घ्यायच्या तयारीत आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसे आ. राजू पाटील यांनी उद्धव ठाकरेंना टॅग करून सूचक ट्विट केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

कल्याण ग्रामीणमधून निवडून आलेल्या राजू पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत आपल्या ट्विट म्हणले आहे की, 'आता ‘U’ ‘T’urn नको! बुलेटट्रेनसाठी महाराष्ट्र सरकारला द्यावे लागणारा हिस्सा व त्यासाठी BKC व इतर ठिकाणी भू संपादीत करायला लागणाऱ्या हजारो कोटी राज्याच्या इतर लोकोपयोगी कामांसाठी वापरावे. बुलेट ट्रेन प्रकल्प बासनात गुंडाळायची #हीच_वेळ_आहे.' असे ट्विट करत राजू पाटील यांनी भू संपादनास व बुलेटट्रेन प्रकल्पास विरोध दर्शवला आहे. 

रोहिणी खडसे, पंकजा मुंडेंच्या पराभवाबाबत खडसेंनी केला मोठा खुलासा!

मोदींची ‘ऑफर’ नाकारली!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही बुलेट ट्रेनसाठी विरोध दर्शवला होता. बुलेट ट्रेन नको म्हणत, त्यांनी मोदी-शहांवर टीका केली. तसेच अहमदाबादला बुलेट ट्रेनने जाऊन काय ढोकळा खायचा आहे का, अशाही शब्दांत राज यांनी टीका केली होती. त्यामुळे मनसेचा एक आमदार असला तरी तो बुलेट ट्रेनला विरोध करणार अशी भूमिका मनसेने घेतली आहे.