Sharad Pawar on Nehru: PM मोदींनी नेहरुंवर केलेल्या टीकेला शरद पवारांचं उत्तर; म्हणाले, योगदान नाही हा...

निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेसबाबतचा निकाल दिल्यानंतर शरद पवार पहिल्यांदा माध्यमांच्या समोर आले आहेत.
Neharu_Modi_Pawar
Neharu_Modi_Pawar

नवी दिल्ली : निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेसबाबतचा निकाल दिल्यानंतर शरद पवार पहिल्यांदा माध्यमांच्या समोर आले आहेत. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत आणि राज्यसभेत देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला शरद पवार यांनी उत्तर दिलं आहे. आज मोदींचं भाषण ऐकून मला दुःख झालं असं त्यांनी म्हटलं तसेच नेहरुंचं योगदान नाकारता येणार नाही, असं त्यांनी म्हटलं. (sharad pawar speaks on jawaharlal nehru regarding pm modi criticism on him)

Neharu_Modi_Pawar
Modi on BR Ambedkar: काँग्रेसला आंबेडकरांना भारतरत्न द्यायचा नव्हता तो भाजपनं दिला; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या विद्यार्थी आघाडीच्यावतीनं शिक्षण आणि बेरोजगारी याबाबत कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमामध्ये बोलताना शरद पवारांनी पंतप्रधानांनी नुकतीच जवाहरलाल नेहरुंवर टीका केली त्याला उत्तर दिलं. तसेच विद्यार्थ्यांच्या आणि शैक्षणिक संस्थांमधील विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. (Latest Marathi News)

Neharu_Modi_Pawar
Nagpur Bus Tiffin Bomb: नागपूरच्या बसस्थानकात आढळला 'टिफिन बॉम्ब'; तीन दिवस डेपोतच होती उभी बस

पवार म्हणाले, "संसदेच सत्र सुरू आहे तिथं पंतप्रधान बोलत होते त्यामुळं मला यायला उशीर झाला. पंतप्रधानांचं भाषण ऐकल्यावर मला दुःख झालं. पंतप्रधान देशाचे पंतप्रधान असतात, कुठल्या एका पक्षाचे नसतात. आपण पंडित नेहरू यांनी केलेल्या कामांकडं डोळेझाक करू शकत नाही. त्यांनी देशासाठी काम केलं.

देशात सुरू झालेली लोकशाही, तिला ताकद देण्याचं काम नेहरूंनी केलं. देशाचा चेहरा बदलण्याचं काम नेहरूंनी केलं. त्यात योगदान देणाऱ्या व्यक्तीबद्दल पंतप्रधान सभागृहात बोलले ते योग्य नाही. नेहरू, इंदिरा गांधी यांनी देशासाठी काही ना काही चांगल काम केलं आहे" (Marathi Tajya Batmya)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com