esakal | अयोध्या - नियोजित राम मंदिराखाली शरयू नदी; पाया काढण्यात पुन्हा अडथळे
sakal

बोलून बातमी शोधा

ram mandir

बांधकाम समितीने मंगळवारी चर्चा केल्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची मदत मागितली आहे. काही दिवसांपूर्वी खांबांचे काम करत असतानाही अडथळा आला होता.

अयोध्या - नियोजित राम मंदिराखाली शरयू नदी; पाया काढण्यात पुन्हा अडथळे

sakal_logo
By
टीम ई सकाळ

अयोध्या - अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. यामध्ये आता एक अडचण निर्माण झाली असून ती सोडवण्यासाठी आयआयटीची मदत मागण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाया खोदत असताना खाली शरयू नदी आढळली आहे. यामुळे बांधकामात अडचण येऊ शकते. यासाठी आता बांधकाम समितीने मंगळवारी चर्चा केल्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची मदत मागितली आहे. काही दिवसांपूर्वी खांबांचे काम करत असतानाही अडथळा आला होता. 

पंतप्रधानांचा माजी मुख्य सचिव नृपेंद्र मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली बांधकाम समितीने मंगळवारी बैठक घेतली. सूत्रांनी सांगितले की, या बैठकीत ठरवण्यात आलं की, पाया काढताना खाली शरयू नदीचा उगम लागला आहे. यामुळे मंदिराचे आधी असलेले मॉडेल योग्य नाही. अयोध्येतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या कामासाठी आता आयआयटीकडे मदत मागितली आहे. 

हे वाचा - ''श्रीराम मंदिर जगाची सांस्कृतिक राजधानी बनेल'' : स्वामी गोविंददेव महाराज

ट्रस्टने आयआयटीकडे मंदीराच्या मजबूत पायाच्या उभारणीसाठी मदत मागितली आहे. मंदिराचे बांधकाम 2023 मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. सध्या समिती दोन पद्धतींवर विचार करत आहे. राफ्टला आधार देण्यासाठी व्हायब्रो दगडाचा वापर किंवा मातीची क्वालिटी आणि पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करणे. 

हे वाचा - नवीन वर्षात राज्य सरकारला सुबुद्धी लाभो; माजी मुख्यमंत्री फडणवीस यांचा टोला

आयोध्येच्या राम मंदिर पूर्ण होण्याकडे भक्तांची नजर आहे. मंदिर उभारण्यासाठी 1200 खांबांचा आराखडा तयार केला होता. मात्र या डिझाइननुसार यश मिळत नसल्याचं दिसत आहे. मंदिराच्या खाली खोलवर खांब पुरून त्याची चाचणी घेण्यात आली. यामध्ये 125 फूट खोल खांब पुरल्यानंतर ते 30 दिवस तसेच ठेवण्यात आले होते. त्यानंतर 700 टन वजन ठेवण्यात आलं आणि भूकंपाचे धक्केही दिले. तेव्हा हे खांब हलले आणि फिरले. त्यामुळे या कामातही अडचण आली आहे.

loading image
go to top