पुढील दशकात अपारंपरिक ऊर्जेचा वाटा ३० टक्‍क्‍यांवर

Solar-Power
Solar-Power
Updated on

नवी दिल्ली - देशातील एकूण ऊर्जा उत्पादनातील अपारंपारिक ऊर्जेचा वाटा २०३० पर्यंत ३० टक्‍क्‍यांवर पोचेल, असा अंदाज द एनर्जी ऍन्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूटच्या (टेरी) अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री आर.के.सिंग यांच्या हस्ते नुकतेच या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. पुढील दहा वर्षातील अपारंपारिक ऊर्जास्त्रोतांच्या वापरासंबंधीचे अध्ययन या अहवालात करण्यात आले आहे. सिंग म्हणाले,‘ ऊर्जेची वाढती मागणी अपारंपारिक ऊर्जास्त्रोतांद्वारे पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी औष्णिक ऊर्जेचा वापर ५५ टक्‍क्‍यांपर्यंत कमी करण्याचा आमचा विचार आहे. तरंगत्या सौर ऊर्जानिर्मितीकडे विशेष लक्ष आहे.'' टेरीच्या माध्यमातून कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी शाश्‍वत ऊर्जास्त्रोतांबाबत मार्गदर्शन करण्यात येते.

विजेची वाढती मागणी भागविण्यासाठी अपारंपारिक ऊर्जास्रोतांचा वापर वाढवावा लागेल. तर कार्बनचे उत्सर्जन कमी करणे शक्‍य आहे. त्यासाठी कोळसा आणि इतर पारंपारिक ऊर्जावापर धोरणात लवचिकता आणावी लागेल. 
- डॉ. अजय माथूर, महासंचालक, टेरी. 

अहवालातील महत्त्वपूर्ण बाबी  

  • कार्बन उत्सर्जन न करणारे ऊर्जा उत्पादन २०३० पर्यंत ४५ टक्‍क्‍यांवर पोचेल 
  • अपारंपारिक ऊर्जास्रोतांचा वापर वाढविण्यासाठी सरकारने मोठे धोरणात्मक बदल करावे 
  • औष्णिक आणि जलविद्युतच वापर मर्यादित स्वरूपात हवा 
  • बॅटरी स्टोअरेज आणि कोळसा वापरासंबंधी धोरण हवे 
  • पॉवर ग्रीडचे सक्षमीकरण आवश्‍यक 
  • अपारंपरिक आणि पारंपरिक ऊर्जास्त्रोतांमध्ये समन्वय वाढवावा लागेल 

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com