
PM मोदी स्वातंत्र्यदिनी भाषणात काय बोलतील? आता तुम्हीच ठरवा...
भारताला स्वातंत्र्य मिळून यंदा ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने मोदी सरकारने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव हा उपक्रम राबवला आहे. या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम, सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. याच अंतर्गत आता मोदींनी भारतीयांना एक आवाहन केलं आहे. (PM Narendra Modi Speech on Independence Day)
दरवर्षी स्वातंत्र्यदिनी म्हणजे १५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान दिल्लीतल्या लाल किल्ल्यावरुन देशवासियांशी संवाद साधतात. यंदाच्या वर्षी सलग नवव्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) भारतीयांशी संवाद साधणार आहेत, तसंच लाल किल्ल्यावर (Red fort in Delhi) तिरंगा फडकावणार आहेत. या सोहळ्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे.
दरम्यान, पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावरील भाषणात काय बोलणार, यासाठी देशवासीयांकडून संकल्पना, मुद्दे मागवण्यात आले आहेत. त्यामुळे आता पंतप्रधान काय बोलणार हे ठरवण्यासाठी भारतीय आपल्या आयडिया देऊ शकतात. कसं जाणून घ्या?
हेही वाचा: अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे पंतप्रधानांना शिवीगाळ करणं नव्हे - हायकोर्ट
तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही दिलेले मुद्दे पंतप्रधान मोदींच्या भाषणात यावेत तर त्यासाठी तुम्हाला ३१ जुलैपर्यंतची मुदत आहे.
MyGovया वेबसाईटवर जा.
Login to Participate या पर्यायावर क्लिक करा.
MyGov अकाऊंटला लॉगिन करा. त्यानंतर तुमच्या मेल आयडीवर किंवा फोन नंबरवर एक ओटीपी येईल.
त्यानंतर होमपेजला जा आणि Login to participate पर्यायावर क्लिक करा.
त्यानंतर खाली All Comments हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करुन तुमची मतं नोंदवा.
त्यानंतर तुम्ही My Submissions या पर्यायावर क्लिक करुन तुम्ही दिलेली मतं चेक करू शकता.
Web Title: Share Your Ideas Directly For Pm Modis Independence Day Speech How
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..