PM Narendra Modi
PM Narendra ModiSakal

अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे पंतप्रधानांना शिवीगाळ करणं नव्हे - हायकोर्ट

आरोपीनं अत्यंत आक्षेपार्ह शब्दांत फेसबूकवर टीकाटिपण्णी केली होती.

लखनऊ : मुलभूत अधिकारांमधील अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि मर्यादा याकडे लक्ष वेधून घेताना अलहाबाद हायकोर्टानं सोमवारी एक महत्वाची टिपण्णी केली. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे पंतप्रधानांना शिवीगाळ करणं नव्हे, असं हायकोर्टानं म्हटलं आहे. तसेच वादग्रस्त फेसबुक पोस्टमुळं अटकेची कारवाई झालेल्या आरोपीला दिलासा देण्यास नकार दिला. न्या. अश्वनी कुमार मिश्रा आणि राजेंद्र कुमार यांच्या खडंपीठानं ही टिपण्णी केली आहे. (Freedom of speech does not mean abusing Prime Minister says Allahabad High Court)

PM Narendra Modi
Indore Bus Accident : मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाखांची मदत; CM शिंदेंची घोषणा

मुमताज मन्सुरी नामक एका व्यक्तीनं अलाहाबाद हायकोर्टात आपल्यावरील गुन्हा रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली होती. हा गुन्हा फेसबूकवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना खंडपीठानं म्हटलं की, अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्या लोकांना लागू होत नाही, जे इतर नागरिकांविरोधात शिवीगाळ करतात. विशेषतः महत्वाची व्यक्ती पंतप्रधान किंवा इतर कोणी केंद्रीय मंत्री असतील.

PM Narendra Modi
राष्ट्रपती निवडणूक: राष्ट्रवादी, काँग्रेसच्या आमदारांनी द्रौपदी मुर्मूंना केलं मतदान!

दरम्यान, आरोपीला अत्यंत आक्षेपार्ह शब्दांत फेसबुक स्टेट्स ठेवल्याबद्दल अटक झाली होती. त्यानं पंतप्रधान आणि गृहमंत्री आणि इतर मंत्र्यांना कुत्रा असं संबोधलं होतं. या बद्दल आरोपीवर भदंविमधील विविध कलमांसह कलम ५०४ आणि कलम ६७ आयटीअॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हायकोर्टान सुनावणीदरम्यान म्हटलं की, एफआयआरमध्ये दखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यामुळं या परिस्थितीत आरोपीवरील गुन्हा रद्द करणं हे योग्य संदेश ठरणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com