भारताच्या पहिल्या महिला IPS अधिकाऱ्यानं Video शेअर करताच लोक भडकले, असं काय आहे त्या व्हिडिओत? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kiran Bedi

बेदींनी व्हिडिओ शेअर करताच सोशल मीडियावर लोकांनी संताप व्यक्त केलाय.

भारताच्या पहिल्या महिला IPS अधिकाऱ्यानं Video शेअर करताच लोक भडकले

भारताच्या पहिल्या महिला IPS अधिकारी किरण बेदी (Kiran Bedi) यांनी सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ शेअर केलाय, त्यावरून त्यांना ट्रोल केलं जातंय. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेली माहिती खरी नसल्यामुळं बेदींना ट्रोल करण्यात आलंय. व्हिडिओमध्ये एक शार्क मासा आणि एक हेलिकॉप्टर दिसत आहे. बेदींनी याबाबतचा व्हिडिओ शेअर करताच सोशल मीडियावर लोकांनी संताप व्यक्त केलाय.

किरण बेदी यांनी मंगळवारी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला. यामध्ये एक शार्क मासा उडत्या हेलिकॉप्टरवर हल्ला करत आहे. इतकंच नाही तर हा शार्क मासा (Shark Fish) या हेलिकॉप्टरला गिळतो आणि समुद्रात बुडवतो, असं व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलंय. परंतु, या व्हिडिओच्या वर जो मजकूर लिहिला गेलाय, त्यात चुकीची माहिती देण्यात आलीय.

हेही वाचा: आमदारांच्या कुटुंबीयांची चौकशी करणाऱ्या IPS अधिकाऱ्याचा तडकाफडकी राजीनामा

खरं तर नॅशनल जिओग्राफिक चॅनलनं (National Geographic Channel) या व्हिडिओचे हक्क दहा लाख डॉलर खर्च करून विकत घेतल्याचं व्हिडिओच्या वर लिहिलंय. तर सत्य हे आहे की, हा व्हिडिओ नॅशनल जिओग्राफिक चॅनलचा नाहीय. अनेक रिपोर्ट्समध्ये असं सांगण्यात आलंय की, हा व्हिडिओ 2017 च्या '5 हेडेड शार्क अटॅक' (5 Headed Shark Attack) या चित्रपटातील एक सीन आहे, जो कोणीतरी चुकीची माहिती देऊन व्हायरल केला होता.

हेही वाचा: Soldiers Skeletons : पंजाबात सापडले तब्बल 282 भारतीय सैनिकांचे सांगाडे

दरम्यान, किरण बेदींची ही पोस्ट व्हायरल होताच, लोकांनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केलीय. किरण बेदींच्या या ट्विट खाली कमेंट करताना अनेक युजर्सनी त्यांना दोन जुन्या ट्विटची आठवण करून दिली, ज्यात त्यांनी चुकीची माहिती शेअर केली होती.

Web Title: Shark Fish Attacking Helicopter Video Viral Former Ips Officer Kiran Bedi Trolled For False Information

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top