
अमृतसर जवळील एका विहिरीच्या खोदकाम दरम्यान तब्बल 282 सांगाडे आढळून आले आहेत.
Soldiers Skeletons : पंजाबात सापडले तब्बल 282 भारतीय सैनिकांचे सांगाडे
सन 1857 मध्ये देशाच्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धात सहभागी झालेल्या 282 भारतीय सैनिकांचे सांगाडे (Indian Soldiers Skeletons) पंजाब विद्यापीठाच्या (Punjab University) मानव वंश शास्त्र विभागाला सापडले आहेत. विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. जे. एस. सेहरावत (Dr J.S. Sehrawat) यांनी सांगितलं की, 1857 मध्ये देशाच्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेल्या 282 भारतीय सैनिकांचे सांगाडे अमृतसरजवळ उत्खननादरम्यान सापडलेत. डुकराचं मांस आणि गोमांसापासून बनवलेल्या काडतुसांच्या वापराविरोधात या सैनिकांनी बंड केल्याचं सांगितलं जातंय.
अमृतसर जवळील एका ठिकाणी विहिरीच्या खोदकाम दरम्यान तब्बल 282 सांगाडे आढळून आले आहेत. हे सांगाडे 1857 च्या स्वातंत्र्य संग्रामातील (The Indian Rebellion of 1857) शहीद झालेल्या सैनिकांचे असल्याचे प्रा. डॉ. जे. एस. सेहरावत यांनी सांगितलंय. प्रा. सेहरावत हे पंजाब विद्यापीठातील मानव वंश शास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. अमृतसर जवळील अजनाला इथं एका धार्मिक वास्तूखाली असणाऱ्या विहिरीच्या खोदकामावेळी हे सांगाडे सापडल्याचाही त्यांनी उल्लेख केलाय.
हेही वाचा: आमदारांच्या कुटुंबीयांची चौकशी करणाऱ्या IPS अधिकाऱ्याचा तडकाफडकी राजीनामा
प्रा. सहरावत म्हणाले, 1857 च्या स्वातंत्र्य संग्रामात गाई आणि डुक्करांच्या मांसापासून बनविण्यात आलेल्या बंदुकीच्या काडतूसांना इंग्रजी राजवटीत असणाऱ्या भारतीय सैनिकांनी विरोध केला होता. त्यानंतर भारतातील पहिलं स्वांतत्र्य संग्राम लढलं गेलं होतं. या सांगड्यांचा (Indian Soldiers Skeletons) अभ्यास केल्यानंतर इथं सापडलेली नाणी, पदकं, डीएनएचा अभ्यास आणि रेडिओ-कार्बन डेटिंग पद्धत यासर्व गोष्टी ही सांगडे 1857 च्या काळातील सैनिकांची असल्याचं सिद्ध झालंय.
हेही वाचा: IAS अधिकाऱ्यावर ईडीची मोठी कारवाई, पूजा सिंघल यांना अटक
ब्रिटिश सरकारविरुद्ध मंगल पांडेंचं बंड
सन 1857 च्या स्वातंत्र्यसंग्रामाला भारतातील पहिले स्वातंत्र्य समर देखील म्हटलं जातं. इंग्रजांविरुद्ध (British Government) झालेल्या या पहिल्या बंडाचे नायक मंगल पांडे हे होते. मंगल पांडे यांनी कलकत्त्याजवळील बराकपूरमध्ये बंडाची सुरुवात केली. 21 मार्च 1857 रोजी बराकपूरमध्ये 34 व्या बंगाल नेटिव्ह इन्फंट्रीच्या (Bengal Native Infantry) सैनिकांची परेड सुरू होती, तेव्हा मंगल पांडे (Mangal Pandey) यांनी ब्रिटिश सरकारविरुद्ध बंडाचं रणशिंग फुंकलं होतं.
Web Title: Skeletons Of 282 Indian Soldiers Who Revolted In 1857 Found During Excavation In Amritsar Punjab University
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..