कोलकाता : पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट केल्याच्या आरोपाखाली कोलकाता पोलिसांनी अटक केलेल्या इन्फ्लुएंसर आणि विद्यार्थिनी शर्मिष्ठा पनोलीच्या (Sharmistha Panoli Arrest) समर्थनार्थ भाजपानं पुढाकार घेतला आहे. दरम्यान, शर्मिष्ठाच्या समर्थनार्थ बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौतही (Kangana Ranaut) मैदानात उतरलीये.