

Do Not Defame Ram Name Says Shashi Tharoor
Esakal
लोकसभेत मनरेगा योजनेचं नाव बदलण्यासह अनेक तरतुदींमध्ये बदलाबाबत विधेयक सादर करण्यात आलं. या विधेयकात मनरेगाला आता विकसित भारत जी रामजी योजना नाव देण्याची तयारी सुरू आहे. यावर संसदेत वादविवाद बघायला मिळाला. काँग्रेसकडून खासदार प्रियांका गांधी यांनी मनरेगाचं नाव बदलण्यास विरोध केला. त्यानंतर खासदार शशि थरूर यांनीही मनरेगाचं नाव बदलण्यावरून हल्लाबोल केला. शशि थरूर म्हणाले की, मी मनरेगा योजनेतून राष्ट्रपिता महात्मा गांधींचं नाव बदलण्याच्या विरोधात आहे. त्याच्या कारणांवर मी जाणार नाही. कारण माझ्या आधीच्या वक्त्यांनी यावर खूप चर्चा केलीय.