
'डोसा'वरुन तक्रार अन् काँग्रेस नेते शशी थरुर यांचे अजब उत्तर
दिल्ली : काँग्रेसचे खासदार शशी थरुर (Shashi Tharoor) हे नेटिझन्समध्ये लोकप्रिय आहेत. कारण त्यांचे ट्विट आणि काॅमेंट यासाठी. यावेळेस नेटकरींचे थरुर यांनी एका वेगळ्या कारणासाठी लक्ष वेधले आहे. केरळमधील कोची विमानतळावर एग वाॅटर डोसा खायला वाढवतानाचा फोटो एका ट्विटर युझरने व्हायरल केला आहे. मला जो डोसा कोची विमानतळावरील अर्थ लाऊन्जवर खायला दिला गेला होता तो अंड्याच्या द्रव्यापासून (Egg Water) बनवले होते, अशी तक्रार मनिष जैन यांनी केले. थरुर यांनी यास आपल्या तऱ्हेवाईक पद्धतीने उत्तर दिले आहे. थिरुअंनतपुरमचे खासदार असलेले थरुर यांनी ट्विटमध्ये लिहिले ट्विटर युझरने चुकीने कोची असे लिहिण्याऐवजी चोची विमानतळ असे लिहिले आहे.
हेही वाचा: माझ्या मुलाचा खून होऊ शकतो, भाजप नेत्याच्या वडिलांची पोलिसांकडे तक्रार
चोचीमध्ये, एक शाकाहारी तरुणाने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. थंडाऐवजी अंडा असं ऐकलं. निष्काळजीपणामुळे चूक घडली आहे. जसे की चावल आणि बैंगन, असे शशी थरुर आपल्या ट्विटमध्ये प्रत्युत्तर दिले. या ट्विटला १ हजार ४०० लोकांनी लाईक्स केले. अनेकांनी प्रतिक्रिया नोंदवून संबंधित व्यक्तीने विनाकारण वाद निर्माण केल्याचे म्हटले आहे. मनिष जैन यांनी ट्विटवर तक्रार केली. त्यात ते म्हणतात, मला डोसा 'एग वाॅटर' चोची विमानतळावर देण्यात आले. मनिष मोठ्या प्रमाणावर ट्रोल होत आहेत. त्यांनी कोल्ड वाॅटर (thanda paani) हे एग वाॅटर (anda paani) असे ऐकल्याची शक्यता वाटते.
Web Title: Shashi Tharoor Reaction On Twitter User Complain Dosa At Kochi Airport
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..