माझ्या मुलाचा खून होऊ शकतो, भाजप नेत्याच्या वडिलांची पोलिसांकडे तक्रार | Tejindarpal Singh Bagga | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Preetpal Singh

माझ्या मुलाचा खून होऊ शकतो, भाजप नेत्याच्या वडिलांची पोलिसांकडे तक्रार

दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते तेजिंदरपाल सिंग बग्गा (Tejindarpal Singh Bagga) यांच्या वडिलांच्या तक्रारीवरुन दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी (ता.सहा) एफआयआर नोंदवला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना धमकवल्याप्रकरणी बग्गा यांना पंजाब पोलिसांनी अटक केले होते, असे वृत्त एएनआयने दिले आहे. तक्रार बग्गा यांचे वडील प्रीतपाल सिंग यांनी दाखल केली असून मुलाच्या अटकेवर लवकर मार्ग काढावा असे त्यांनी म्हटले आहे. काही लोकांची टोळी शस्त्रे घेऊन भाजप (BJP) नेत्याच्या घरात आली होती. (My Son May Be Killed, Tejindar Singh Bagga's Father Complain To Police In Delhi)

हेही वाचा: Jammu-Kashmir | जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांच्या चकमकीत तीन दहशतवादी ठार

सिंग यांना कानशीलात देऊन भाजप नेता कुठे आहे असे ते विचारात होते, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. जनकपुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत पुढे म्हटले आहे, की पगडी घालण्यापूर्वीच बग्गा यांना नेण्यात आले. परवानगीशिवाय त्यांना घराबाहेर ओढण्यात आले. माझ्या मुलाचा खून केला जाईल. मी विनंती करतो की त्याचा जीव वाचवा, असे प्रीतपाल सिंग यांनी एफआयआरमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा: कल्याण-डोंबिवलीतील मनसे पदाधिकाऱ्यांचा शिवसेनात प्रवेश,एकनाथ शिंदे म्हणाले...

मी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. मला पंजाब पोलिस कर्मचाऱ्यांनी मारहाण केली. मी अद्याप तेजिंदरशी बोललो नाही. दिल्ली पोलिसांच्या सहकार्याबद्दल आभार मानतो, असे सिंग हे एएनआय वृत्तसंस्थेशी बोलले.

Web Title: My Son May Be Killed Tejindar Singh Baggas Father Complain To Police In Delhi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top