काँग्रेसचे नेते शशी थरूर जखमी; पडले सहा टाके

वृत्तसंस्था
सोमवार, 15 एप्रिल 2019

शशी थरुर यांच्या डोक्याला मार लागला असून, डोक्याला सहा टाके पडले आहेत. मात्र, डॉक्टरांनी त्यांची प्रकृती चिंताजनक नसल्याचे सांगितले.

तिरुवअनंतपुरम (केरळ): काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरुर हे येथील एका मंदिरात पूजा करत असताना त्यांच्या डोक्याला जखम झाली. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. थरुर यांच्या डोक्याला मार लागला असून, डोक्याला सहा टाके पडले आहेत. मात्र, डॉक्टरांनी त्यांची प्रकृती चिंताजनक नसल्याचे सांगितले.

थंपानूर येथील गंधारी अमन कोवित मंदिरात शशी थरुर यांची तुला करण्यात येत होती. त्यावेळी थरुर हे एका तराजूत बसले होते. तराजूच्या दुसऱया बाजूला काही साहित्य ठेवण्यात येत होते. त्यावेळी दुसऱ्या तराजूतील साहित्य कमी-अधिक झाल्याने थरुर यांचा तोल गेला. त्यामुळे त्यांना अपघात होऊन त्यांच्या डोक्याला जखम झाली. उपचारासाठी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान डोक्याला सहा टाके पडले आहेत. सुदैवाने, गंभीर दुखापत झाली नसून, त्यांची प्रकृती ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Web Title: Shashi Tharoor suffered 6 stitches on his head while worshiping in the temple in kerala