शशी थरुर यांना कोलकता न्यायालयाकडून समन्स

वृत्तसंस्था
शनिवार, 14 जुलै 2018

2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळविल्यास भारतात हिंदू पाकिस्तानसारखी परिस्थिती निर्माण होईल. या विजयानंतर भाजपकडून नवे संविधान लिहिले जाईल, यामध्ये भारताला पाकिस्तानसारखे बनण्याचा रस्ता मोकळा झालेला असेल. त्यावेळी भारतात अल्पसंख्यांकांच

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) विजय मिळविल्यास भारताचा हिंदू पाकिस्तान होईल, असे वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते शशी थरूर यांना कोलकता न्यायालयाकडून समन्स पाठविण्यात आले आहे.

थरुर यांनी नुकतेच म्हटले होते, की 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळविल्यास भारतात हिंदू पाकिस्तानसारखी परिस्थिती निर्माण होईल. या विजयानंतर भाजपकडून नवे संविधान लिहिले जाईल, यामध्ये भारताला पाकिस्तानसारखे बनण्याचा रस्ता मोकळा झालेला असेल. त्यावेळी भारतात अल्पसंख्यांकांचा त्यांच्या देशात कोणताही सन्मान केला जाणार नाही. यावर भाजपकडून काँग्रेस अध्यक्ष ऱाहुल गांधी यांनी माफी मागण्याची मागणी करण्यात आली होती.

या वक्तव्याप्रकरणी वकील सुमीत चौधरी यांनी कोलकता न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यांनी याचिकेत थरूर यांच्या वक्तव्यामुळे संविधानाचा अपमान झाला असल्याचे म्हटले आहे. न्यायालयाने या प्रकरणी थरूर यांना समन्स पाठवत 14 ऑगस्टला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: Shashi Tharoor summoned by Kolkata court over his Hindu-Pakistan comment against BJP