शशिकला यांचे तमिळनाडूत भव्य स्वागत; तुरुंगवासानंतर सुटका झाल्याने समर्थकांमध्ये आनंद

शशिकला यांचे तमिळनाडूत भव्य स्वागत; तुरुंगवासानंतर सुटका झाल्याने समर्थकांमध्ये आनंद

चेन्नई - भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन चार वर्षांची तुरुंगवास भोगल्यानंतर तमिळनाडूला परतलेल्या अण्णाद्रमुकमधील निलंबित नेत्या व्ही. के. शशिकला यांचे त्यांच्या समर्थकांनी भव्य स्वागत झाले. तमिळनाडूत होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शशिकला यांचे तमिळनाडूला परतणे हे महत्त्वपूर्ण मानले जात आहे. 

तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या अत्यंत निकट असलेल्या शशिकला यांना भ्रष्टाचाराचा आरोपावरून चार वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. त्या बंगळूरमधील तुरुंगात ठेवण्यात आले होते. शिक्षा पूर्ण झाल्याने शशिकला यांची काही दिवसांपूर्वी सुटका झाली होती. मात्र त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या आज चेन्नईत परतल्या. बंगळूरपासून चेन्नईपर्यंतच्या संपूर्ण प्रवासात ठिकठिकाणी शशिकला यांचे भव्य स्वागत करण्यात आले. अण्णा द्रमुकच्या चेन्नईतील मुख्य कार्यालयावर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. शशिकला यांचे समर्थक राज्यात हिंसाचाराचा कट आखत असल्याचा आरोप केला. 

गाडीवर अण्णाद्रमुकचा झेंडा 
शशिकला यांचा ताफा तमिळनाडूमध्ये शिरला त्यावेळी त्यांच्या गाडीवर अण्णा द्रमुक पक्षाचा झेंडा होता. पोलिसांनी तो काढून टाकल्यावर शशिकला यांनी अण्णा द्रमुकच्या एका कार्यकर्त्याच्या गाडीत बसत पुढील प्रवास केला. या गाडीवरही पक्षाचा झेंडा होता. शिक्षा भोगून आल्यानंतर आणि आता जयललिता नसल्याने शशिकला राजकारणापासून दूर राहतील, हा विरोधकांचा अंदाज शशिकला यांनी फोल ठरविला आहे.  

मी राजकारणात निश्‍चितच येणार आहे. जयललिता यांच्याबरोबर काम करणाऱ्यांनी यापुढेही एकत्रच राहून काम करावे. अण्णा द्रमुकचा प्रभाव वाढविण्यासाठीच काम करणार आहे. जयललिता यांच्या इच्छेप्रमाणे हा पक्ष पुढील १०० वर्षे टिकून राहण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.   
- शशिकला, अण्णा द्रमुकच्या माजी नेत्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com