
- काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा यांना पाकिस्तानातील एका लग्न सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले.
नवी दिल्ली : काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा यांना पाकिस्तानातील एका लग्न सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी या सोहळ्याला उपस्थित लावली आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर टीका केली जात आहे.
ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे ऍप डाऊनलोड करा
शत्रुघ्न सिन्हा यांचा पाकिस्तानातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आता यावरून संताप व्यक्त केला जात आहे. याबाबतचा व्हिडिओ पाकिस्तानी फोटोग्राफर ओसमान परवेज मुगलने शेअर केला आहे.
तसेच हा व्हिडिओ शेअर करत ‘रीमा आणि शत्रूजी यांनी हेमा आणि अहमद यांच्या कव्वाली नाइटला हजेरी लावली’ असे कॅप्शन दिले.