
शत्रुघ्न सिन्हा हे अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. ते 1990 ते 2015 पर्यंत भाजपचे स्टार प्रचारक होते.
नवी दिल्ली Bihar Election 2020- माजी केंद्रीय मंत्री तथा ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी टि्वटरवर दोन क्लिप्स शेअर केले असून त्यात त्यांनी म्हटले की, पृथ्वीवर दोन लोकांना शोधणं अशक्य आहे. एक मोदींचा वर्गमित्र आणि दुसरा तो ग्राहक ज्याने मोदींच्या हातचा चहा घेतला. तर दुसऱ्या क्लिपमध्ये त्यांनी म्हटले की, चूक ही आपल्या पाठीप्रमाणे असते. जी स्वतः शिवाय इतर सर्वांना दिसते. त्यांनी पुढे म्हटले की, या कंटाळवाण्या रविवारच्या दिवशी या दोन क्लिपसह आराम करा आणि आनंद घ्या... हसणे आरोग्यासाठी चांगले असते..'
Enjoy these clips on a relaxed & lazy Sunday.....all for a good laugh #SpecialSundayHumour pic.twitter.com/fGGeHmIHmQ
— Shatrughan Sinha (@ShatruganSinha) November 1, 2020
शत्रुघ्न सिन्हा हे अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. ते 1990 ते 2015 पर्यंत भाजपचे स्टार प्रचारक होते. परंतु, पक्षांतर्गत मतभेदांनंतर त्यांनी 2019 मध्ये भाजपचा राजीनामा दिला होता. 2019 ची लोकसभा निवडणूक त्यांनी काँग्रेसकडून लढवली होती. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद हे तेथून विजयी झाले होते. बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांचे पुत्र लव सिन्हा हे काँग्रेसकडून पाटणा येथील बांकीपूर मतदारसंघातून उमेदवार आहेत.
हेही वाचा- Video : ...आणि भरसभेत ज्योतिरादित्यांनी काँग्रेसला मतदान करण्याचे केले आवाहन
सिन्हा यांनी नुकताच एका वृत्त वाहिनीशी बोलताना बिहारच्या 'का बा, ई बा' राजकारणावर भाष्य केले होते. लव सिन्हा, तेजस्वी यादव यांच्यासारखे युवक राजकारणात आल्याने बिहारमध्ये 'का बा चे उत्तर बिहार में जान बा' असे दिले जात आहे. पंतप्रधानांनी वचन देऊनही बिहारला आर्थिक पॅकेज दिले नसल्याचा आरोपही केला.
हेही वाचा- Unlock 6.0 Guidelines: आजपासून अनलॉक 6.0 सुरु, जाणून घ्या काय-काय सुरु होणार