नवी दिल्ली- उत्तराखंडमधील अंकिता भंडारी नावाच्या युवतीच्या हत्येने संपूर्ण देश हादरला होता. त्याचबरोबर या हत्याकांडानंतर उत्तराखंडमधील भाजप सरकार विरोधी पक्षांच्या निशाण्यावर आले आहे. काँग्रेसनेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू आहे. या यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी देखील याच मुद्दावरून भाजपवर कडाडून टीका केली. (Rahul Gandhi news in Marathi)
राहुल गांधी पायी चालून भारत जोडो यात्रेचे नेतृत्व करत आहे. ही यात्रा मंगळवारी केरळमधील मलप्पुरममध्ये दाखल झाली होती. या यात्रेत राहुल गांधी यांच्यासोबत महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्याही होत्या आणि त्यांच्या हातात बिल्किस बानो आणि अंकिता भंडारी यांना न्याय देण्याची मागणी करणारे पोस्टर्स होते.
यादरम्यान राहुल गांधींनी केरळमध्ये जाहीर सभेला संबोधित करताना म्हटले की, "भाजपच्या कारनामे तुम्ही सर्वजण पाहात आहात. उत्तराखंडमध्ये एका तरुणीने स्वत:ला विकण्यास नकार दिल्याने भाजप नेत्याच्या मुलाने तिची हत्या केली. भाजप महिलांचा किती आदर करतो यातून दिसून येत आहे.
राहुल गांधींनी उत्तराखंडमधील घटनेबाबत ट्विट करून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आणि मोदी सरकार गुन्हेगारांसाठी काम करत असल्याचं म्हटले आहे. राहुल गांधींनी ट्विट करून लिहिले की, पंतप्रधानांचा नारा बेटी बचाव आहे. मात्र भाजपचे धोरण बलात्कारी वाचवा. ते भारताचे पहिले पंतप्रधान असतील ज्यांनी केवळ खोटी आणि पोकळ भाषणे दिली. त्यांचं राजवट गुन्हेगारांसाठी समर्पित आहे. मात्र यावर आता भारत गप्प बसणार नाही.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.