Sheena Bora Murder Case | शीना बोरा हत्याकांड: इंद्राणी मुखर्जीला जामीन मंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sheena Bora Murder Case
शीना बोरा हत्याकांड: इंद्राणी मुखर्जीला जामीन मंजूर

शीना बोरा हत्याकांड: इंद्राणी मुखर्जीला जामीन मंजूर

सर्वोच्च न्यायालयाने शीना बोरा हत्याकांडात इंद्राणी मुखर्जी हिला जामीन मंजूर करण्यात आला आहे. साडे सहा वर्षांनंतर हा जामीन मंजूर होत आहे. इंद्राणी मुखर्जी सध्या मुंबईतल्या भायखळा तुरुंगात आहे. शीना बोरा हिच्या हत्येप्रकरणी ती गेल्या साडेसहा वर्षांपासून कारागृहात आहे. (Sheena Bora Murder Case News)

हेही वाचा: "शीना बोरा जिवंत असून काश्मीरमध्ये आहे"; पाहा व्हिडिओ

इंद्राणी मुखर्जीला याआधी अनेकदा तिचा जामीन फेटाळण्यात आला होता. मुंबई सत्र न्यायालय, उच्च न्यायालय कोणीही जामीन दिलेला नव्हता. कारण तिच्यावर तिचीच मुलगी शीना बोरा (Sheena Bora Murder Case) हिची आपला पूर्व पती, ड्रायव्हर यांच्या मदतीने हत्या केल्याचा आरोप होता. यात तिचा पती पीटर मुखर्जीचाही हात होता. याचा तपास सीबीआयकडे देण्यात आला होत्या. गेल्या तीन वर्षांत इंद्राणीने (Indrani Mukharjee) एकही पॅरोल घेतला नव्हता. याच सगळ्या गोष्टी लक्षात घेत सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे. न्यायमूर्ती भूषण गवई जे पूर्वी मुंबई उच्च न्यायालयात होते, आता सर्वोच्च न्यायालयात आहेत. त्यांच्या खंडपीठाने हा जामीन दिलेला आहे. त्यामुळे इंद्राणी मुखर्जीला मोठा दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा: शीना बोरा जिवंत असल्याचा इंद्राणी मुखर्जीचा दावा, चौकशीसाठी सीबीआयने मागितला वेळ

काय आहे शीना बोरा हत्याकांड प्रकरण?

२४ एप्रिल २०१२ रोजी शीना बोराची हत्या करण्यात आली होती. इंद्राणी मुखर्जीचा ड्रायव्हर शामवर राय याला बेकायदेशीर हत्यार बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे इंद्राणी मुखर्जीला २०१५ मध्ये अटक करण्यात आली. इंद्राणीचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्ना आणि चालक शामवर राय यांनी मिळून इंद्राणीची पहिल्या पतीपासून झालेली मुलगी शीना बोरा हिची हत्या केली आणि रायगड जिल्ह्यात एका अज्ञात स्थळी तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली.

२०१५ मध्ये ही घटना उघडकीस आल्यावर कळलं की इंद्राणीने शीनाची गळा दाबून हत्या केली होती आणि नंतर त्याची विल्हेवाट लावण्यात आली. या कटात सहभागी असल्याच्या आरोपाखाली इंद्राणीचा पती पीटर मुखर्जीलाही अटक केली होती. २०२० मध्ये त्याला जामीन देण्यात आला. खटला सुरू असताना पीटर आणि इंद्राणी यांनी घटस्फोट घेतला.

Web Title: Sheena Bora Murder Case Parol Granted To Indrani Mukharjee By Supreme Court

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top