Sheikh Hasina accuses US and Pakistan of conspiracy
esakal
देश
Sheikh Hasina : ''माझं सरकार पाडण्यामागे अमेरिका अन् पाकिस्तानचा हात'', शेख हसीना यांनी विद्यार्थी आंदोलनामागचं नेमकं कारण...
Sheikh Hasina accuses US and Pakistan of conspiracy : बांगलादेशमधील विद्यार्थी आंदोलनानंतर माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी अमेरिका आणि पाकिस्तानवर गंभीर आरोपही केले. तसेच त्यांनी हे आंदोलन तयार करण्यामागचं कारण सांगितलं.
बांगलादेशमध्ये झालेल्या विद्यार्थी आंदोलनानंतर माजी पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडावा लागला होता. त्यानंतर त्यांनी दिल्लीत आसरा घेतला. मात्र, बांगलादेशमधील या आंदोलनावर आता पहिल्यांदा शेख हसीना यांनी भाष्य केले आहे. हे आंदोलन अमेरिका आणि पाकिस्तान पुरस्कृत होतं असं आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे.
