
Mani Shankar Aiyar Appeals to Modi Government : राजकीय अस्थिरतेमुळे बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतला आहे. नुकताच भारत सरकारने त्यांच्या व्हिजाची मुदतही वाढवली आहे. यादरम्यानच आता शेख हसीना यांना हवं तितके दिवस भारतात राहण्याची परवानगी द्यावी, असं विधान काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर विविध राजकीय चर्चांनाही उधाण आलं आहे.