फूट पाडण्याचे राजकारण धोकादायक...

बंगळूरची जगभरात वेगळी ओळख आहे. स्टार्टअप्सची राजधानी आणि देशाच्या उद्यमशीलतेला प्रगतीपथावर नेणारे शहर
Shekhar Gupta writes politics division is dangerous Bangalore politics
Shekhar Gupta writes politics division is dangerous Bangalore politicssakal
Summary

बंगळूरची जगभरात वेगळी ओळख आहे. स्टार्टअप्सची राजधानी आणि देशाच्या उद्यमशीलतेला प्रगतीपथावर नेणारे शहर. एकसंध, सौहार्द आणि सर्वसमावेशक संस्कृती जपणारे शहर...या संस्कृतीला धक्का लावण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाच्या वतीने सुरू झाला आहे. फूट पाडण्याच्या राजकारणामुळे येथील समाजभान ढवळून निघत आहे..

भारतातील सर्वोत्तम महानगर म्हणून बंगळूरची जगभर ओळख आहे. या शहराची संस्कृती, तोंडवळा, या शहराची प्रकृती, उद्योजकता आणि महत्त्वाकांक्षी तरुणाईला आकर्षित करते. येथे कार्यरत उत्कृष्ट शैक्षणिक संस्था, त्या संस्थांमधून राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांमधून विविध प्रतिभांचा आविष्कार पाहावयास मिळतो. नोकऱ्यांच्या संधी, शहरीकरण, जगण्यासाठी आवश्यक सुविधांची रेलचेल, उपलब्ध पायाभूत सुविधांमुळे या शहराला पसंती दिली जाते. प्रत्येकाच्या हाताला काम देणारी आणि प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण करणारी मुंबईनगरी मानली जाते. त्या रांगेमध्ये बंगळूर उभे राहिले आहे. नोकरीच्या संधी आणि ग्लॅमरसाठी भारतातील नवी स्वप्ननगरी.

वीस वर्षांत मी अनेकदा बंगळूरला गेलो. बंगळूरला जाणे हा आनंददायी प्रवास असतो.जेव्हा तुम्हाला काही त्रास होत असेल, तुम्हाला मनःशांती हवी असेल, जगण्याची वेगळी मजा घ्यावयाची असेल, तेव्हा बंगळूर गाठा, असाच सल्ला देईन. मी बंगळूरला ‘बंगळूर द फिल गुड सिटी’ असे म्हणूनच संबोधतो. येथे पुरेसा मॉन्सून बरसतो आणि उन्हाळाही सुसह्य होईल असाच असतो.(काही वर्षांपासून ते थोडे जास्त तापू लागले आहे) त्यामुळेच कर्नाटक आणि बंगळुरात जी काही फुटीरतावादी घटना घडत आहे त्या वाऱ्यासारख्या पसरत आहेत आणि हीच धोक्याची घंटा आहे.

येथे रुजू पाहणारे द्वेषाचे राजकारण, पडणारी फूट, सुरू असलेले भावनिक राजकारणामुळे वातावरण दूषित होऊ लागले आहे. मुंबईतही असेच होऊन तेथे वातावरण बिघडून गेले.काही महिन्यांत बंगळूरमध्ये नव्याने घडणाऱ्या घटनांमुळे ही बाब अधोरेखित होत आहे. त्यावर भारतातील प्रसिद्ध महिला उद्योजिका किरण मजुमदार शॉ यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.राज्यातील बदलत्या परिस्थितीबाबत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी हस्तक्षेप करावा, धार्मिक फूट ही काळजी करण्याची बाब आहे, राज्यात शांतता प्रस्थापित करावी. जातीय बहिष्काराच्या घडणाऱ्या घटनांमुळे कर्नाटकचे जागतिक नेतृत्व नष्ट होईल.तेव्हा हे रोखा, असे आवाहन त्यांनी केले. या आवाहनानंतर हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला.

‘हिजाब’वरून सुरू असलेला वाद शमतो न शमतो तोपर्यंत हिंदू मंदिरे, धार्मिक कार्यक्रमाच्या शेजारील मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी घालण्याचे प्रकार घडले. हलाल उत्पादनांवर बहिष्काराचे केलेले आवाहनामुळे वातावरण गढूळ होत आहे. राजकीय हेतूने सुरू असलेल्या प्रकारांमुळे सामाजिक सौहार्दाला धोका पोचत आहे. वर्षभरानंतर होणाऱ्या निवडणुकांसाठी ही पायाभरणी तर सुरू नाही ना, हा प्रश्न उपस्थित होतो. भाजपने काँग्रेस आणि संयुक्त जनता दलातील आमदारांचे पक्षांतर करून सत्ता हिसकावून घेतली. त्यानंतर सरकार सतत अस्थिर वातावरणात काम करत आहे. ही अस्थिरता संपवून येथे भक्कम सरकार आणण्यासाठीचे प्रयत्न भाजपकडून सुरू झाले आहेत. येथे काँग्रेसला पराभूत करण्यासाठी पुन्हा एकदा उत्तरेप्रमाणे पावले टाकण्यास सुरवात केली आहे.

राजकारणात निवडणुका जिंकण्यासाठी कोणत्याही सामाजिक परिणामांची पर्वा केली जात नाही. दहा वर्षांत भाजपने तीव्र हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरण घडवून आणत सत्तेचा मार्ग प्रशस्त केला आहे. मुस्लिम मतांचा फायदा घेण्यापेक्षा ५० टक्के हिंदू मते मिळविल्यानंतर मुस्लिम मतदान कोठेही झाले तरी जिंकता येते. अशी व्यवस्था रुजविण्याचा प्रयत्न चालविला आहे. राज्यात २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत हा फॉर्म्युला पूर्णपणे उपयोगी ठरला नव्हता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ सभा घेऊनही सत्ता मिळविण्याएवढे संख्याबळ गाठता आले नव्हते. अर्थात त्यानंतर वर्षभरात पक्षांतर घडवून सत्ता काबीज करण्यात यश मिळाले आणि येडियुरप्पा मुख्यमंत्री झाले. लिंगायत मताचे प्रबळ दावेदार असलेले येडियुरप्पा मूक आणि असंतुष्ट मुख्यमंत्री होते. त्यानंतर बोम्मई मुख्यमंत्री झाले मात्र त्यांच्या मागे मोठ्या संख्येने अनुयायी नाहीत. त्यामुळे भाजपने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. मुळातच भाजप कोणतीही निवडणूक जीवन मरणाची लढाई आहे, अशा पद्धतीने लढवत असतो. तेलंगणातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत हे दिसून आले आहे आणि कोणत्याही स्थितीत दक्षिणेत त्यांना विस्तार वाढवायचा आहेच.मात्र त्यांच्या विचारप्रवाहाचा फटका बसू शकतो. त्यांचे फुटीरतावादी धोरण सामाजिक ऐक्य बिघडवत आहे आणि त्याचा फटका बंगळूरमध्ये काम करणाऱ्या सर्जनशील तरुणांच्या मनावर होत आहे.

हिबाज वाद, मुस्लिम व्यापाऱ्यांना मंदिर परिसरात व्यवसायास बंदीमुळे येथील वातावरण गढूळ होत आहे. नवउद्योजकता आणि गुंतवणुकीची भरभराट होण्यासाठी सामाजिक एकसंधता आवश्यक असताना त्यावरच हल्ला होत आहे. हे धोकादायक आहे. पाकिस्तान, म्यानमार, श्रीलंका येथील अराजक त्या देशांच्या मुळावर आले आहे,हे पाहायला हवे आणि याचा गांभीर्याने विचार करावयास हवा.

बंगळूरची जगभरात वेगळी ओळख आहे. स्टार्टअप्सची राजधानी आणि देशाच्या उद्यमशीलतेला प्रगतीपथावर नेणारे शहर. एकसंध, सौहार्द आणि सर्वसमावेशक संस्कृती जपणारे शहर...या संस्कृतीला धक्का लावण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाच्या वतीने सुरू झाला आहे. फूट पाडण्याच्या राजकारणामुळे येथील समाजभान ढवळून निघत आहे...

यूनिकॉर्नमध्ये बंगळूर अव्वल

ventureintelligence.com वरून मिळालेल्या अद्ययावत डेटानुसार, देशातील ९५ भारतीय युनिकॉर्नपैकी ३७ बंगळूरमध्ये आहेत. त्या तुलनेत मुंबईमध्ये १७, गुरुग्राममध्ये १३, दिल्ली आणि नोएडामध्ये प्रत्येकी ४ पाहावयास मिळतात. आशादायी बंगळूरमधील वातावरण पाहिल्यास तुम्हाला चैतन्य आणि आशावादाचा महापूर येथे अनुभवता येईल. येथील व्यावसायिक इमारती, येथील आयटी पार्क, येथील रेस्टॉरंट, पब, बार, विमानतळ परिसर, महाविद्यालयांचा परिसर येथे तरुणाई नवनव्या उत्पादनांसाठी काम करताना दिसेल. लॅपट़ॉपवर विविध सौदे करताना दिसतील.नवी स्वप्ने पाहत ती सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com