Shikhar Dhawan : बांगलादेशमध्ये हिंदू महिलेवर सामूहिक बलात्काराच्या घटनेवर शिखर धवनचा संताप, म्हणाला..

Shikhar Dhawan Condemns Brutal Attack on Hindu : शेख हसीना यांचे सरकार पडल्यापासून, बांगलादेशात हिंदूंवर हल्ल्यांच्या अनेक घटना घडल्या आहेत.
Indian cricketer Shikhar Dhawan expresses anger and concern over the Bangladesh Hindu woman gang rape incident, condemning violence and injustice.

Indian cricketer Shikhar Dhawan expresses anger and concern over the Bangladesh Hindu woman gang rape incident, condemning violence and injustice.

esakal

Updated on

Shikhar Dhawan Reacts to Bangladesh Incident : भारताचा माजी क्रिकेटपटू शिखर धवनने बांगलादेशमध्ये हिंदूंसह अल्पसंख्याकांवर होणाऱ्या हल्ल्यांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तसेच बांगलादेशमध्ये एका हिंदू महिलेवर झालेल्या क्रूर हल्ल्याचा आणि सामूहिक बलात्काराच्या घटनेचा तीव्र निषेधही व्यक्त केला आहे. 

संबंधित पीडित हिंदू महिलेवर आधी सामूहिक बलात्कार केला गेला आणि नंतर तिला झाडाला बांधले गेले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामुळे शिखर धवनकडून संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे.

ट्विटरवरील एका पोस्टमध्ये शिखर धवन म्हणाला की, "बांगलादेशमध्ये एका हिंदू विधवेवर झालेल्या क्रूर हल्ल्याबद्दल वाचून मन दुखावले. कोणाविरुद्धही, कुठेही असा हिंसाचार सहन करता येणार नाही. न्यायासाठी प्रार्थना आणि पीडितेला पाठिंबा."

Indian cricketer Shikhar Dhawan expresses anger and concern over the Bangladesh Hindu woman gang rape incident, condemning violence and injustice.
Bangladesh Hindu journalist shot dead: बांगलादेशात आता भरबाजारात हिंदू पत्रकाराची गोळ्या झाडून हत्या!

शिखर धवन सोशल मीडियावर सक्रिय असतो आणि अनेकदा जगभरात घडणाऱ्या घटनांवर भाष्य करतो. शिखर धवनने २०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तथापि, तो जगभरातील अनेक लीगमध्ये सक्रिय राहतो. गेल्या वर्षी, त्याने कॅनडा सुपर 60 मध्ये भाग घेतला होता, तो व्हाईट रॉक वॉरियर्स संघात होता.

Indian cricketer Shikhar Dhawan expresses anger and concern over the Bangladesh Hindu woman gang rape incident, condemning violence and injustice.
Hindu Youth Killed in Bangladesh : बांगलादेशात आणखी एका हिंदू तरूणाला मारलं! २० दिवसांत कट्टरपंथीयांकडून सातवी हत्या

दुसरीकडे, गेल्या वर्षी शेख हसीना यांचे सरकार पडल्यापासून, बांगलादेशात हिंदूंवर हल्ल्यांच्या अनेक घटना घडल्या आहेत. डिसेंबरपासून बांगलादेशमध्ये किमान सहा हिंदूंची हत्या करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांत भारत आणि बांगलादेशमधील संबंधही लक्षणीयरीत्या बिघडल्याचे दिसत आहेत. नुकतेच मुस्तफिजुर रहमान यास आयपीएल फ्रँचायझी केकेआरने काढले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com