सिमल्यात हिमवृष्टी; जनजीवन विस्कळीत

वृत्तसंस्था
शनिवार, 7 जानेवारी 2017

सिमलामध्ये या मोसमात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी झाली आहे. या हिमवृष्टीमुळे उत्तर भारतात शीतलहर पसरली असून, अनेक ठिकाणचा पारा घसरला आहे.

सिमला - हिमाचल प्रदेशातील सिमला, मनाली आणि डलहौसी येथे शुक्रवारी रात्री जोरदार हिमवृष्टी झाली. या हिमवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, रस्त्यांवर बर्फ साचला आहे.

हिमवृष्टीमुळे सिमला व मनालीमधील अनेक भागांचा वीजपुरवठा खंडीत झाला. झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत. रस्त्यांवर बर्फाचे थर साचल्याने वाहतूक थांबविण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मनालीच्या अलिकडे 20 किमी अंतरावर पाटलीकुल येथे बर्फ साचल्याने रस्ता बंद करण्यात आला आहे.

सिमलामध्ये या मोसमात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी झाली आहे. या हिमवृष्टीमुळे उत्तर भारतात शीतलहर पसरली असून, अनेक ठिकाणचा पारा घसरला आहे. हिमाचल प्रदेशात काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला आहे.

Web Title: Shimla, Manali Cut Off After Snow, Traffic Hampered, Electricity Lines Snapped