'भारतमातेच्या महान सुपुत्राला नमन'; PM मोदींनी शिवजयंतीनिमित्त शेअर केला VIDEO

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 19 February 2021

त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन ट्विट करत छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भातील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.  

राज्याचे अराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळतोय. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास केवळ राज्यालाच नाही तर संपूर्ण देशासह जगासाठी प्रेरणा देणारा असा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शिवाजी महाराजांना नमन केले. त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन ट्विट करत छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भातील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.  

भारत मातेचे सूपुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निम्मित शत-शत नमन! त्यांचे साहस, अद्भूत शौर्य आणि प्रचंड बुद्धिमत्तेची गाथा देशविसियांना युगा-युगात प्रेरणा देईल, अशी आहे, असे ट्विट मोदींनी केले आहे. आपल्या ट्विटसह त्यांनी एक खास व्हिडिओ देखील शेअर केला आहे. 

शिवजयंती 2021 : किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम

पुणे जिल्ह्यातील शिवनेरी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थानी परंपरेनुसार जन्मसोहळा साजरा करण्यात येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उप-मुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह  खासदार संभाजीराजे छत्रपती हेसुद्धा जन्मसोहळ्यासाठी उपस्थितीत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे काही निर्बंधासह हा उत्सव साजरा केला जात आहे. राज्य सरकारने 100 लोकांनाच परवानगी दिल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आणि राज्यसभेचे खासदार  संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्ती केली होती.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shiv jayanti 2021 PM Modi pays tribute to Chhatrapati Shivaji Maharaj on his birth anniversary