Shiv Jayanti 2023 : शिवजयंती तारीख अन् तिथी वाद नक्की काय आहे? का शिवजयंती दोनदा साजरी केली जाते?

काही जण तारखेनुसार तर काही जण तिथीनुसार शिवजयंती साजरी करतात
Shiv Jayanti 2023
Shiv Jayanti 2023esakal

Shiv Jayanti 2023 : हिंदवी स्वराज्याचे सम्राट असे नाव ज्यांच्या कारकीर्दीने कोरले गेले ते शिवाजी महाराज. त्यांच्या अद्वितीय कामगिरीमुळे त्यांना रयतेचा राजासुद्धा म्हटले जाते. देशभरात या महान पुरुषाचा जन्मदिवस मोठ्या उत्साहाने मोठ्या सणाप्रमाणे साजरा केला जाते. दरवर्षी मोठ्या आतुरतेने शिवप्रेमी (shiv premi) आपल्या लाडक्या राजाच्या जयंतीची वाट बघत असतात. मात्र शिवप्रेमींमध्ये वेगवेगळे गट आहेत. काही जण तारखेनुसार तर काही जण तिथीनुसार शिवजयंती साजरी करतात.

मात्र शिवजयंती दोन वेळा का साजरी केली जाते. नेमका काय आहे तारीख आणि तिथीचा वाद जाणून घेऊया. दृढनिश्चय आणि मावळ्यांना सोबत घेत छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रावर असलेल्या विजापूरच्या आदिलशाहीचा आणि मुघलांचा बिमोड करत हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. अशा या छत्रपती शिवाजी महाराजांची शिवप्रेमींकडून दोन वेळा शिवजयंती साजरी केली जाते. एक शिवजयंती 19 फेब्रुवारी रोजी तर दुसरी शिवजयंती तिथीनुसार साजरी केली जाते.

काय आहे तारीख आणि तिथीचा वाद

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 म्हणजेच फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 रोजी झाला. शिवाजी महाराजांच्या जन्म तारखेबद्दल सुरुवातीपासून वाद आहे. हा वाद सोडविण्यासाठी पहिल्यांदा 1966 मध्ये महाराष्ट्र सरकारने इतिहासकारांची समिती नेमली. या समितीत महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार, न.र. फाटक, आ.ग. पवार, हा.ग. खरे, वा.सी. बेंद्रे, ब.मो. पुरंदरे व मोरेश्वर दीक्षित यांचा समावेश होता. या समितीच्या सदस्यांचे देखील तारखेवर एकमत झाले नाही. तसेच समितीने सरकारलाच निर्णय घेण्याचे सुचविले.

सरकारने देखील जोपर्यंत इतिहासकारांमध्ये एकमत होत नाही तोपर्यंत जुनीच तारीख कायम ठेवली. अखेर 2000 साली आमदार रेखा खेडेकर यांनी 1966 मधील समितीचा अहवाल आणि उपलब्ध पुरावे सादर करत विधिमंडळात 19 फेब्रुवारी 1630 हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म दिवस असल्याचा प्रस्ताव मांडला.

हा प्रस्ताव सभागृहाने मान्य करत शिवजयंती 19 फेब्रुवारी रोजी साजरी केल्याचे निश्चित केले. तर महाराष्ट्रात अनेक मराठी सण उत्सव हे तिथीवर साजरी करण्याची परंपरा आहे. त्यानुसार शिवसेना सारख्या संघटनांनी सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवित शिवजयंती इंग्रजी कॅलेंडरनुसार न साजरी करता तिथीनुसार साजरी करण्याचा आग्रह धरला. त्यानुसार शिवसेना सारख्या संघटना आणि तिथीला महत्व देणारे शिवप्रेमी तिथीनुसार म्हणजेच फाल्गुन वद्य तृतीया या दिवशी शिवजयंती साजरी करतात. तर काही शिवप्रेमी वैशाख वद्य द्वितीया शके 1559 ( 6 एप्रिल 1627 ) रोजी शिवाजी महाराजांचा जन्म झाल्याचे मनात त्या दिवशी शिवजयंती साजरी करतात. (Birth Anniversary)

Shiv Jayanti 2023
Shiv Jayanti : शिवजयंतीच्या अशा द्या हटके शुभेच्छा; पहा एकापेक्षा एक भारी मेसेज

पुण्यात साजरी झाली होती पहिली शिवजयंती

महाराष्ट्रात पहिल्यादा सन 1870 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी सार्वजनिक शिवजयंती साजरी करण्यास सुरुवात केली. शिवजयंतीचा हा कार्यक्रम पुण्यात पार पडला होता. तत्पूर्वी 1869 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी रायगडवरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. त्यानंतर शिवाजी महाराज यांच्या जीवनावर त्यांनी पहिला पोवाडा रचला. शिवाजी महाराजांचे विचार आणि त्यांची शौर्यगाथा घराघरात पोहचावी यासाठी शिवजयंती साजरी करण्यात आली. तेव्हापासून शिवजयंती मोठ्या प्रमाणात सर्वत्र साजरी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com