
प्रत्येक मावळ्याचे रक्त सळसळून निघेल अशी ऐतिहासिक घटना 10 नोव्हेंबर 1659 रोजी घडली. स्वराज्यावर वाकडी नजर ठेवून चाल करुन आलेल्या आदिलशाहीचा बलाढ्य सरदार अफजल खानाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी वध केला. हा दिवस इतिहासामध्ये सोनेरी अक्षराने लिहावा असा आहे. आजही अफजलखानाचा वध हा प्रसंग आठवला तरी अंगावर काटा आल्याखेरीज राहणार नाही. या दिवसाची आठवण म्हणून हा दिवस शिवप्रताप दिन म्हणून साजरा केला जातो.
आजच्या लेखात आपण 10 नोव्हेंबर हा दिवस 'शिवप्रताप दिन' म्हणून का साजरा केला जातो?आणि त्यामागची शौर्य कथा काय आहे याविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत.
स्वराज्याच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाच्या अशा ऐतिहासिक घटनेची आठवण करुन देणारा हा आजचा दिवस आहे.
उंच आणि शक्तिशाली धिपाड अशा अफजल खानाला छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या बौद्धिकचातुर्याने ठार मारले.त्यावेळी बिजापूरच्या राजा अदिलशहा होता. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी बिजापूरच्या सर्व क्षेत्रावर आधिपत्य मिळविले होते.
1659 मध्ये बिजापूरचा राजा असणाऱ्या आदिलशाहसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे जणू एक मोठे भयंकर संकट म्हणून त्यांच्या डोळ्यासमोर उभे राहिले. आदिलशहाला समजले होते की जर छत्रपती शिवाजी महाराजांना जर जिवाने संपविले नाही तर ते आपल्यासाठी अंत्यत धोकादायक ठरू शकतात.
या पूर्वी देखील आदिलशहाने छत्रपती शिवाजी महाराजांना ठार मारण्याचा प्रयत्न बऱ्याच वेळा केला होता.परंतु त्या मध्ये त्याला यशच आले नाही. शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांचा वध करण्यासाठी त्याने उंच आणि शक्तिशाली धिपाड अशा अफजल खानाची स्वराज्यात पाठवणी केली.
तो दिवस होता 10 नोव्हेंबर1659 चा.
अफजल खान हा रणनीती बनविण्यात पटाईत होता.त्याने याआधी छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी राजे ह्याची हत्या केली होती. तो जेव्हा स्वराज्यात येत होता तेव्हा त्याने आपल्या सैन्यासह वाटेत येणारे गाव आणि सर्व मंदिरे उद्ध्वस्त करत वाई पर्यंत पोहोचला आणि तिथे आल्यावर त्याने छत्रपती शिवाजी महाराजांना भेटावयास बोलाविले. परंतु छत्रपती शिवाजी महाराज मी आपल्याला घाबरलो आहोत मी तिथे येत नाही आपणच प्रतापगडाला या. असा निरोप धाडला.
अफजल खान प्रतापगडच्या पायथ्याशी पोहोचला.तिथे छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान त्यांच्या भेटीसाठी भव्य शामियाना उभारला होता. छत्रपती शिवाजी महाराज हे प्रतापगडाच्या किल्ल्यावर होते. त्यामुळे शत्रुच्या कोणत्याही सैन्याला तिथवर पोहोचणे हे अवघड होते.
अफजल खानाने छत्रपती शिवाजी महाराजांना भेटण्याचा निरोप पाठविला. छत्रपती शिवाजी महाराजांना त्याच्या घातपाती क्रुर अशा स्वभावाची आधीच कल्पना होती.भेटीसाठी काही अटी ठरवण्यात आल्या त्या असे ठरले की, भेटीसाठी कोणतेही हत्यार कोणाकडे नसतील आणि दोन्ही पक्षाचे 10 अंगरक्षक असतील त्या अंगरक्षकांपैकी एक शामियानाच्या बाहेर थांबेल.
भेटीच्या वेळी अफजलखान वेळेआधीच शामियानेत पोहोचला.शामियाना मोठा होता. निःशस्त्र भेटायचे असे आधीच ठरले होते. तरी ही कपटी अफजलखानाने आपल्या अंगरख्याखाली कट्यार लपवून ठेवली होती.
अफजलखान काही कट कारस्थान करून घात पात करेल ह्याचा अंदाज हा छत्रपती शिवाजी महाराजांना आलाच होता. म्हणून त्यांनी देखील आपल्या अंगरख्याखाली आधीच चिलखत घातले ,जिरेटोप खाली शिरस्त्राण घातले आणि मुठीत सहज न दिसणारी अशी वाघनखे लपविली होती.
दोघांचे वकीलच हे बरोबर असतील असे ठरलेच होते. अफजल खानाची उंची पुरी देहयष्टी होती तरी ही छत्रपती शिवाजी राजे न घाबरता शामियानात पोहोचले. शिवरायांना बघून या 'शिवबा' आमच्या मिठीत या असं म्हणत अफजल खानाने मिठी मारण्यासाठी हात पसरविले आणि त्यांना जवळ बोलविले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला मिठी मारली. अफजल खान ने त्यांना आपल्या बाहुपाशेत घेण्याचा प्रयत्न केला आणि अफजल खानाने लपविल्या कट्यारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीत वार केला आणि त्यांना आपल्या काखेत दाबण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराज हे पूर्वी पासून सावध होते. अफजल खानाच्या प्रहाराने छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मुठीतील वाघनखे काढून त्याच्या पोटात घुसवून त्याच्या आतड्याचं बाहेर काढल्या आणि त्याला ठार केले. अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा आपल्या बुद्धी कोशल्यतेने वध केला.
अफजलखानाने "दगा दगा" म्हणत आकांत केला त्याच्या आवाजाला ऐकून बाहेर उभारलेला सय्यद आत आला अफजल खान ला ठार झालेले बघून त्याने दांडपट्ट्याने छत्रपती शिवाजी महाराजांवर हल्ला करण्याच्या प्रयत्न केला. तो पर्यंत जिवा महालाने त्याच्या वाराला निष्फळ करून त्याच्या वर मागून हल्ला करून सय्यदला ठार मारून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्राणाचे रक्षण केले. तेव्हा पासुन मग "होता जिवा म्हणून वाचला शिवा "असे म्हणतात.
आधीच झाडीत लपलेल्या सर्व मावळांनी अफजलखानाच्या सैन्यावर हल्ला चढवला आणि त्यांना पळा भुई थोडी करून पळवून लावले.आज हे युद्ध प्रतापगड युद्ध म्हणून ओळखले जाते.
प्रतापगडावर झालेली अफजलखान आणि छत्रपती शिवरायांची भेट आणि त्या भेटीत अफजलखानाने दिलेला दगाफटका ज्यास तोडीस तोड असे शिवरायांनी दिलेले उत्तर आणि अफजलखानाचा केलेला वध या सर्व गोष्टी आजही तितक्याच ताज्या आहेत. मराठ्यांच्या साम्राज्यावर चाल करुन आलेल्या या हुशार, बलाढ्य, शक्तिशाली अफजल खानाला शिवाजी महाराजांनी आपल्या अचूक रणनीतीने ढेर केले. या घटनेने प्रजा सुखी झाली आणि स्वराज्यावर आलेले संकट छत्रपतींनी पळवून लावल्याने गावागावात आनंदोत्सव राहिला होता. त्यांच्या या विश्वासाच्या जोरावर छत्रपतींनी रयतेचे राज्य घडवले.
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत! आदर्श राज्यकर्ता म्हणून त्यांचे नाव अगदी अगत्याने घेतले जाते. जनमानसांत आपल्या गुणांमध्ये अढळ स्थान निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना आज शिवप्रताप दिनी त्रिवार मानाचा मुजरा!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.