शिवसेनेचे अजूनही तळ्यात-मळ्यात सुरूच

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - नोटाबंदीच्या केंद्राच्या निर्णयाची ‘एतिहासिक निर्णय’ अशी भलावण करणाऱ्या शिवसेनेने पुढच्या २४ तासांत पुन्हा घूमजाव करीत याच नोटीबंदीच्या विरोधात राष्ट्रपतींकडे जाणाऱ्या मोदी सरकारविरोधी शिष्टमंडळात सहभागी होण्याचे फर्मान आपल्या २१ खासदारांना काढले आहे. यामुळे या प्रश्‍नावरील शिवसेनेचे तळ्यात-मळ्यात आगामी हिवाळी अधिवेशनात चालूच राहील, असे दिसते आहे. दरम्यान, उद्याच्या (ता. १६) शिष्टमंडळात शिवसेनेने सहभागी होऊ नये यासाठी खुद्द पंतप्रधानांच्या पातळीवर आज रात्रीतून हालचाली होतील, असे भाजप सूत्रांनी सांगितले. 

नोटेबंदीच्या निर्णयाने सर्वसामान्यांचे जे अनन्वित हाल सुरू आहेत त्यामुळे विरोधी पक्ष संतप्त झाले असून, या निर्णयाच्या विरोधात पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली अनेक विरोधी पक्ष उद्या (ता. १६) राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार आहेत. शिवसेनेने प्रथम नोटाबंदीवर आगपाखड केली. नंतर नोटाबंदीचा निर्णय एतिहासिक असल्याचे एनडीएच्या बैठकीत काल सांगितले होते. त्यानंतर २४ तासांच्या आत शिवसेनेने चक्क मोदी सरकारविरोधी शिष्टमंडळात जाण्याचे जाहीर केले आहे. खुद्द शिवसेनेच्या संसदीय कार्यालयातून आज प्रत्येक खासदाराला एसएमएस पाठविण्यात आला व उद्या (ता. १६) दुपारी दीडला राष्ट्रपती भवनात जमण्यास सांगितले गेल्याचे खात्रीलायकरीत्या समजते. 

शिवसेनेच्या गोटातून याबाबत कोणी स्पष्टपणे बोलत नसल्याने दिल्लीत धूसरता आहे. 

अमित शहांकडून शिवसेनेशी संपर्क नाही 

जर स्वतः पंतप्रधानांनीच शिवसेना नेतृत्वाशी आज चर्चा केली तर शिवसेना उद्याच्या शिष्टमंडळात नसू शकते, असेही सांगितले जाते. सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेना एनडीएचा घटकपक्ष असल्याने भाजप अध्यक्षांनी शिवसेना नेतृत्वाबरोबर बोलणे अपेक्षित होते. मात्र, अमित शहा हे शिवसेना नेतृत्वाबरोबर अजिबात संबंध, संपर्क ठेवू इच्छित नाहीत व त्यामुळेच आता नाईलाजाने पंतप्रधान संबंधितांशी चर्चा करण्याची शक्‍यता आहे. मात्र, त्याआधी अर्थमंत्री अरुण जेटली हे रात्री शिवसेना नेतृत्वाबरोबर चर्चा करतील, असे भाजप गोटातून सांगितले गेले.

शिवसेनेचे नवे कार्यालय सज्ज

तब्बल २१ खासदार संसदेत असूनही शिवसेनेला दोन-तीन खासदार निवडून देणाऱ्या पक्षांपेक्षाही लहान कार्यालय संसद भवनात देण्यात आले आहे. मोठे कार्यालय देण्याची शिवसेनेची विनंती मोदी सरकारने धुडकावली. त्यानंतर आहे त्या कार्यालयाचे तरी नूतनीकरण करा, अशा अर्जविनंत्या शिवसेनेने केल्या. त्यावर शिवसेना कार्यालयाच्या नूतनीकरणाचे काम सुरू झाले. ते दोन महिने चालले. अखेर आज शिवसेनेने आपला संसदीय कामकाजाचा संसार नव्या कार्यालयात हलविला. मात्र, याही कार्यालयातील फर्निचर आज रात्रीपर्यंत आलेलेच नव्हते.

मोदींना पवार चालू शकतात, तर शिवसेनेला ममता बॅनर्जी का नाही. ममता बॅनर्जी यांच्यासोबत राष्ट्रपतींकडे जायला काय हरकत आहे. मोदींच्या विरोधात नाही तर जनतेच्या हितासाठी ममतांसोबत जाऊ शकतो. जिल्हा बॅंकेवरची बंदी अन्यायकारक आहे.

- उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

Web Title: Shiv Sena confused for currency