CAB : शिवसेनेचा मोदी सरकारला टेकू; राज्यसभेत गैरहजर

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 11 December 2019

नागरिकत्व घटनादुरूस्ती वर लोकसभेत काॅंग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा  वेगळी भूमिका घेऊन विधेयकाला पाठिंबा देणाऱया शिवसेनेने राज्यसभेतील मजुरीवेळी अनुपस्थित राहून  बहिर्गमनाचा मार्ग चोखाळला व एका अर्थाने पुन्हा सरकारला पूरक भूमिका घेतली.

नवी दिल्ली : नागरिकत्व घटनादुरूस्ती वर लोकसभेत काॅंग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा  वेगळी भूमिका घेऊन विधेयकाला पाठिंबा देणाऱया शिवसेनेने राज्यसभेतील मजुरीवेळी अनुपस्थित राहून  बहिर्गमनाचा मार्ग चोखाळला व एका अर्थाने पुन्हा सरकारला पूरक भूमिका घेतली.

#CAB : नागरिकत्व सुधारणा विधेयक राज्यसभेतही मंजूर

लोकसभेतील मंजुरीनंतर शिवसेनेने तळ््यात मळ्यात सुरू केले होते. या पक्षाचे नेते संजय राऊत यांनी आजच्या भाषणातही पाठिंबा देणार की काॅंग्रेसप्रमाणे विरोध करणार हे स्पष्ट केले नव्हते. अखेरीस मतदानाच्या वेळी शिवसेनेचे तीनही सदस्य गैरहजर राहिले. यामुळे सरकारच्या बहुमताचा आकडा १२६ वरून आणखी खाली आला व सरकारसाठी शिवसेनेची भूमिका पुन्हा सहाय्यभूतच ठरली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप 

दरम्यान गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या उत्तराच्या भाषणात शिवसेनेला टोला लगावताना, सत्तेसाऑठी लोक कसे कसे रंग बदलतात , असा हल्ला चढविला होता. राऊत यांनी त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला पण शहा यांनी त्यावरही प्रतिहल्ला करताना, महाराष्ट्राची जनताच हे  जाणू इच्छित आहे की एका रात्रीत असे काय ाजले की शिवसेनेने आपली भूमिका बदललीय़ असा तिखट सवाल केला. त्यावर राऊत ाकली बसले. त्यानंतर ाकही वेळातच ते व अनिल देसाई सभागृहाच्या बाहेर निघून गेले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena does not vote for Citizenship Bill in Rajya Sabha