शिवसेना एनडीएतून बाहेर; अरविंद सावंत यांचा राजीनामा सुपूर्द 

टीम ई-सकाळ
Monday, 11 November 2019

या वातावरणात मी केंद्रात काम करणं योग्य नाही. ते नैतिकदृष्ट्याही योग्य नाही. : अरविंद सावंत 

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्ता समीकरणे बदलत असताना शिवसेनेने केंद्रातील एनडीए सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या संदर्भात केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत यांनी सकाळीच आपण राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले होते.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

काय म्हणाले सावंत? 
दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत अरविंद सावंत यांनी म्हणाले, 'देशाचा मंत्री म्हणून शपथ घेतली होती. पंतप्रधानांनी मला केंद्रीय अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम खात्याची जबाबदारी दिली होती. आज, महाराष्ट्राच्या राजकारणात विश्वासार्हतेला तडा गेला. सत्तेच्या समान वाटपाचा निर्णय सहमतीन झाला. पण, आता ते नाकारण्यात आलं. शिवसेनेला खोटं ठरवण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळं विश्वासार्हता नाही. अशा वातावरणात मी केंद्रात काम करणं योग्य नाही. ते नैतिकदृष्ट्याही योग्य नाही. मी आज, माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठविला आहे.' पत्रकार परिषदेनंतर सावंत यांनी सर्व पत्रकारांना राजीनाम्याचे पत्र दाखवले. 

नकटं असावं पण, धाकटं असू नये, शिवसेनेला प्रत्यय

रस्ते की परवाह करुंगा तो... : संजय राऊत 

सावतं यांचे ट्विटस् 
अरविंद सावंत यांनी सकाळीच ट्विटरवरून आपली भूमिका स्पष्ट केली होती. लोकसभा निवडणुकीपूर्वीच सत्ता वाटपाचा फॉर्म्युला ठरला होता. तो दोन्ही पक्षांनी मान्य केला होता. तो नाकारून शिवसेनेला खोटे ठरवण्याचा प्रयत्न झाला. शिवसेनेला खोटे ठरवण्याचा प्रयत्न केला. पण, शिवसेनेची बाजू सत्याची आहे, अशी भूमिका सावंत यांनी मांडली. शिवसेनेला खोटं ठरवणं हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानास कलंक लावणारा प्रकार आहे, असं सावंत यांनी म्हटलं होतं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shiv sena leader arvind sawant resigns as central minister quits with nda