
मोदींच्या तोडीचा दुसरा नेता दिसत नाही - संजय राऊत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 71 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांना जगभरातून शुभेच्छा देण्यात येत आहेत. सर्वजण त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी संजय राऊत यांनी मोदी यांच्यावर कौतुकांचा वर्षाव केला. अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतर नरेंद्र मोदी सर्वाधिक प्रभावशाली नेते आहेत. मोदी यांच्या संघर्षाचा काळ आम्ही जवळून पाहिला आहे. त्यांच्या तोडीचा दुसरा नेता दिसत नाहीस, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, नरेंद्र मोदी हे देशाचे मोठे नेते आहेत, अनेक वर्षापासून ते देशाचे नेतृत्व करत आहेत, त्यांच्या संघर्षाचा काळ आम्ही पाहिला आहे, मोदी यांच्या काळात देशाला राजकीय स्थैर्य लाभले आहे, भाजपा नेहमीच आघाड्या बनवून सत्तेत होते, मात्र मोदींच्या काळात एक हाती सत्ता बनवू शकले, ही मोदींच्या नेतृत्वाची आणि लोकप्रियतेची कमाल आहे, हे मान्य करायला हव, नरेंद्र मोदी यांच्या तोडीचा दुसरा नेता आज देशात दिसत नाही, हेही तितकंच खरं आहे. मोदी यांच्याबद्दल कितीही वाद असले तरी ते देशाचे पंतप्रधान आहेत, म्हणून आपण त्यांना शुभेच्छा द्यायला हव्यात, मी देखील त्यांना उदंड आयुष्य लाभो अशा शुभेच्छा देतो.
हेही वाचा: Live : 'एकत्र आलो तर भावी...', मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याची चर्चा
सोनू सूदच्या घरावर ईडीची धाड
सोनू सूद विषयी पक्षाची भूमिका असण्याचे कारण नाही. मात्र गेल्या वेळी याच सोनू सुदने अनेक प्रवासी मजुरांसाठी गाड्या, विमान बुक केली होती, त्यावेळी भाजपने आम्हाला सांगितलेलं. की एकटा माणूस काय करू शकतो, मात्र सरकार म्हणून आम्ही काही करत नाही. मात्र काल मला समजलं, केजरीवाल सरकारच्या एका शैक्षणिक धोरणाविषयीचे काम सोनूने घेतल्यावर या सरकारचा सोनू सूद दुश्मन झाला. ज्याने कर चुकला आहे त्यावर कारवाई व्हायला पाहिजे, मात्र त्यामागे ही पार्श्वभूमी असल्याचे मला आता लक्षात आले, असे म्हणाले.
चंद्रकांत पाटील यांच्या वर्तव्यावर काय म्हणाले राऊत?
चंद्रकांत दादा हे राजकीय विरोधक जरी असले तर ते आमच्या सर्वांचे चांगले मित्र आहेत, आमच्या त्यांना कायम सदिच्छा आहेत, काल ते म्हणाले मला माजी मंत्री म्हणू नका, ही माजी म्हणून घ्यायची वेदना मी समजू शकतो, पण मी त्यांना निरोप पाठवला आहे की पुढील पंचवीस वर्ष तुम्हाला माजी म्हणूनच राहावं लागेल, उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आम्ही हे सरकार किमान पंचवीस वर्षे चालवु, त्यामुळे पंचवीस वर्ष मनाची तयारी ठेवा, ते जर स्वप्न पाहत असतील तर त्यांना बघू द्या, अजून तरी स्वप्नावर कोणताही टॅक्स लावलेला नाही. माझ्या असे कानावर आले आहे की नागालँडचे राज्यपाल म्हणून त्यांना विचारणा केली आहे, म्हणून कदाचित ते म्हणाले असतील, जर नागालँडचे राज्यपाल म्हणून ते जात असतील तर त्यांना माझ्या शुभेच्छा
Web Title: Shiv Sena Mp Sanjay Raut Wish Pm Modi Happy Birthday Pm Modi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..