Live Update : प्रसंग आला तर शिवसेना-भाजप एकत्र येतील - दानवे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Live : प्रसंग आला तर शिवसेना-भाजप एकत्र येतील - दानवे

Live : प्रसंग आला तर शिवसेना-भाजप एकत्र येतील - दानवे

Marathwada Liberation Day 2021 in Maharashtra : मराठवाड्यात आज शुक्रवारी (ता.१७) सर्वत्र मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन साजरा केला जात आहे. या निमित्त आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले आहे. तसेच नांदेडमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येणार आहेत. आज दिवसभर औरंगाबादसह मराठवाड्यातील इतर जिल्ह्यात महत्त्वाच्या घडामोडींना वेग येईल असे दिसते. या सर्व घटनांचं पाहा Live Update...

हेही वाचा: मुख्यमंत्र्यांची गुगली... भाजपाला सोबत घेण्यासाठी चाचपणी?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना उद्देशून भावी सहकारी असा उल्लेख केला. त्यांच्या या वक्तव्याची चर्चा जोरात सुरु आहे.

दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर अंतर्गत उभारल्या जात असलेल्या ऑरीक सिटीमध्ये औद्योगिक व मनोरंजन क्षेत्रासाठी पायाभूत सुविधांचा समावेश आहे. यामुळे रोजगार निर्मिती होत असून अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी नियंत्रण कक्षातून या कामाची पाहणी केली.

दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर अंतर्गत उभारल्या जात असलेल्या ऑरीक सिटीमध्ये औद्योगिक व मनोरंजन क्षेत्रासाठी पायाभूत सुविधांचा समावेश आहे. यामुळे रोजगार निर्मिती होत असून अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी नियंत्रण कक्षातून या कामाची पाहणी केली.

चंद्रकांत पाटील भाजप महाराष्ट्र अध्यक्ष आहेत. ते शिवसेनेसोबतच्या युतीचे संकेत देऊ शकतात. वातावरण बदलत असेल. भाजप नेत्यांनी स्विकारलं तर मी का विरोध करणार? - नारायण राणे

उद्धव ठाकरेंच्या मनातलं मी कसं ओळखणार? मी काही ज्योतिषी नाही. ते आज काय बोलतील उद्या काय ते सांगू शकत नाही - नारायण राणे

उद्धव ठाकरे पुढील तीन वर्ष मुख्यमंत्री राहतील, असे अश्वासन दिल्यास भाजपसोबत युती करु - अब्दुल सत्तार

अमित शाह नांदेडमध्ये दाखल, अखिल भारतीय वृक्षारोपण अभियान २०२१ अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमात करणार संबोधित

अमित शाह नांदेडमध्ये दाखल, अखिल भारतीय वृक्षारोपण अभियान २०२१ अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमात करणार संबोधित

मुख्यमंत्री आणि आमच्यात मुंबईत पुन्हा एकदा चर्चा होणार - दानवे

शिवसेना-भाजप एकत्र येण्यासाठी अब्दुल सत्तार मध्यस्थी करतील - दानवे

प्रसंग आला तर पुन्हा आम्ही एकत्र येऊ शकतो - दानवे

शिवसेना-भाजप एकत्र आल्यास राज्यातील जनतेला आवडेल - दानवे

शिवसेना राष्ट्रवादी-काँग्रेससोबत गेल्याची खंत राज्यातील जनतेला आहे. - दानवे

शिवसेना-भाजपचा मतदार एकच आहे. - दानवे

शिवसेना-भाजप समविचारी पक्ष, आमचा विचार राज्यातील जनतेलाही मान्य आहे - रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री

संजय राऊत यांना कोणी सिरियसली घेत नाही. संजय राऊत यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पाठवणार आहेत अशी मला माहिती आहे. चंद्रकांत पाटील यांचा खोचक टोमणा

उद्धव ठाकरे यांच्या मनात काय आहे हे जाणण्या एवढा मी मनकवडा नाही - चंद्रकांत पाटील

महाविकास आघाडी सरकार जास्तवेळ टीकणार नाही , भाजप सक्षम विरोधी पक्षनेता म्हणून काम करत आहे. - फडणवीस

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनातील भावना बोलून दाखवली असेल. राजकारणात कधी काय होऊ शकतं सांगता येत नाही. पण आज तसं चित्र नाही.- फडणवीस

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या इमारतीचे बांधकाम कोणत्याही परिस्थितीत १८ महिन्यांत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. लोकांच्या सेवेसाठी बांधल्या जात असलेल्या या इमारतीचे बांधकाम उच्च दर्जाचे व्हायला हवे असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या इमारतीचे बांधकाम कोणत्याही परिस्थितीत १८ महिन्यांत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. लोकांच्या सेवेसाठी बांधल्या जात असलेल्या या इमारतीचे बांधकाम उच्च दर्जाचे व्हायला हवे असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं दुसरं सूचक वक्तव्य. एकत्र आलो तर भाजप भावी सहकारी ठरतील. एकत्र यायचं की नाही हे येणारा काळ ठरवेल, असं खळबळजनक वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

आपण केलेल्या कामाची जाहीरात झाली पाहिजे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राजकारणाला विकृत स्वरुप येऊ नये - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

गृहमंत्री अमित शहा मुदखेड दौऱ्यावर, CRPF केंद्रात जय्यत तयारी

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुदखेडमध्ये शुक्रवारी दुपारी 12 वाजता अखिल भारतीय वृक्षारोपण अभियान २०२१ अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमाचे उद्घाटन करणार आहेत. या कार्यक्रमाची सीआरपीएफ केंद्रामध्ये जय्यत तयारी झाली आहे. शहा या ठिकाणी सैनिक संमेलनात जवान व अधिकाऱ्यांना संबोधित करणार आहेत.

मुख्यमंत्री काय म्हणाले होते?

औरंगाबाद येथे बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपसोबतच्या युतीचं संकेत दिलं. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे व्यासपीठावर असताना 'आजी, माजी आणि एकत्र आलो तर भावी सहकारी' असं वक्तव्य मख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर राज्यात राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.

रावसाहेब दानवे काय म्हणाले?

शिवसेना-भाजप समविचारी पक्ष आहेत.

मुख्यमंत्री अनुभवी आहेत. त्यामुळे 'ते' वक्तव्य केलं असेल.

मुख्यमंत्री म्हणाले, या एकदा बसून बोलूयात -

ठरलं तर दोन्ही पक्षाचे नेते एकत्र येवून ठरवतील -

येत्या काही दिवसांत राज्यात मोठ्या घडामोडी घडतील -

भाजपसोबत जाण्याचा पर्याय खुला आहे, असा संदेश राष्ट्रवादीला द्यायचा असावा, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर प्रविण दरेकरांची प्रतिक्रिया..

- एकत्र आलो तर भावी.... - मुख्यमंत्री

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे व्यासपीठावर असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात करताना आजी, माजी आणि एकत्र आलो तर भावी सहकारी, असं वक्तव्य केल्यानंतर राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.

तुमच्यामुळेच आज आम्ही सत्तेत आहोत. तुमच्या आशिर्वादाचं बळ कायम ठेवा - मुख्यमंत्र्यांचं जनतेला आवाहन

काम नसेल तरी नुसतं पाहण्यासाठी यावं असं औरंगाबाद जिल्हा परिषदेचं कार्यालाय बनवायला हवं - उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

मराठवाड्यात संतपीठ हवेच - उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

राज्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे - मुख्यमंत्री

रुळ सोडून रेल्वे धावू शकत नाही, म्हणून मला आवडते - मुख्यत्र्यांचा उपहासात्मक टोला

मुंबई-नागपूर बुटेलट्रेनसाठी पुढाकार घेणार असाल तर राज्य सरकार तुमच्या पाठीशी, उद्धव ठाकरेंकडून दानवेंना अश्वासन

समृद्धी महामार्गाला लागून रेल्वे सुरु करायची वेळ आली तर राज्याने भूसंपादन करायला मदत करावी - दानवे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

औरंगाबाद शहर मराठवाड्याचं इंजिन - रावसाहेब दानवे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घोषणांमुळे औरंगाबादेत आनंदाचे वातावरण आहे - उद्योगमंत्री सुभाष देसाई

पुढच्या काळात मराठवाड्यात अनेक उपक्रम येतील, दानवेंची माहिती

हेही वाचा: मराठवाडा मुक्तिसंग्रामातील हुतात्मा सोलापूरचे लाला वाघमारे

हेही वाचा: मराठवाड्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून घोषणांचा पाऊस, विरोधकांना काढले चिमटे

हेही वाचा: ज्याप्रमाणे निजामाशी लढलो, तसेच कोविडसोबत लढू - उद्धव ठाकरे

हेही वाचा: अमित शहा आज नांदेड दौऱ्यावर; राजकीय वर्तुळाचं लक्ष

हेही वाचा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून संतपीठाची घोषणा

हेही वाचा: औरंगाबादेत एमआयएमचे उपरोधिक आंदोलन सुरु

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top