नोटाबंदीच्या निर्णयावर शिवसेनेची कोलांटउडी

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - मोठ्या नोटांवर रातोरात बंदी घालण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाने देशात आर्थिक अराजक आल्याची आगपाखड करणाऱ्या शिवसेनेने दिल्लीत आज झालेल्या भाजप घटक पक्षांच्या बैठकीत सपशेल घूमजाव करत हा ऐतिहासिक निर्णय असल्याचे सांगून त्याची तोंडभरून प्रशंसा केली. 

शिवसेनेचे संसदीय नेते या निर्णयाची भलावण करत असताना, त्याच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिल्लीतच नोटबंदीच्या निर्णयावर टीका घेताना याचा फटका आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनाला बसेल, अशी भविष्यवाणी केल्याने या एकाच पक्षातील वेगवेगळ्या आवाजांचा विनोदी ध्वनी राजधानीत घुमला.

मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एनडीएच्या बैठकीला लालकृष्ण अडवानी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा, शिवसेनेचे आनंदराव अडसूळ, लोकजनशक्ती पक्षाचे रामविलास पासवान यांच्यासह इतर पक्षांचे नेते उपस्थित होते. पासवान म्हणाले, जुनी इमारत पाडली जाताना धूळ उडते, तसा सध्याचा गोंधळ आहे. अडसूळ म्हणाले, की नोटाबंदीच्या निर्णयाला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा असून, आम्ही त्याचे स्वागत करतो. 

Web Title: Shiv Sena is the U-turn for ban notes