Shiva Sharma Death Case: शिवा शर्मा मृत्यू प्रकरणात अंडरवर्ल्ड कनेक्शन; मॉडेल श्रद्धा दुबेचे मुंबईच्या कुख्यात 'झेड गँग'शी लागेबांधे उघड

Shiva Sharma Death Case: लखनौमधील हॉटेल व्यावसायिक शिवा शर्मा यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात श्रद्धा दुबे हिचे मुंबईतील कथित ‘झेड गँग’शी संपर्क असल्याच्या दाव्याची तपास यंत्रणा पडताळणी करत आहे.
Police investigate alleged underworld links in the Shiva Sharma death case as digital evidence from seized iPhones is examined.

Police investigate alleged underworld links in the Shiva Sharma death case as digital evidence from seized iPhones is examined.

esakal

Updated on: 

लखनौमधील हॉटेल व्यावसायिक शिवा शर्मा यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाच्या तपासात मुंबईतील कथित ‘झेड गँग’शी संबंधित धागेदोरे समोर आल्याचा पोलिसांचा दावा आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेली सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि मेक-अप आर्टिस्ट श्रद्धा दुबे हिचा या टोळीशी संपर्क असल्याच्या दिशेने तपास सुरू आहे. उत्तर प्रदेश विशेष कृती दलाने (एसटीएफ) श्रद्धा, तिची बहीण रश्मी आणि चालक दानिश यांना नागपूरमधून अटक केली. पोलिसांनी श्रद्धाकडून तीन आयफोन जप्त केले असून, त्यांचा वापर आणि त्यातील संपर्कांची तपासणी केली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com