अखिलेश यादव यांची शिवभोजन थाळीची घोषणा, युपीतही मिळणार १० रुपयात जेवण

Akhilesh Yadav announces Shivbhojan Thali
Akhilesh Yadav announces Shivbhojan ThaliAkhilesh Yadav announces Shivbhojan Thali

पुढील काही दिवसांत पाच राज्यांमध्ये विधान परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. यामध्ये उत्तर प्रदेशचाही समावेश आहे. यामुळे येथील राजकीय वातावरण चांगलेट तापले आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच पक्षांकडून नव्या नव्या घोषणा केल्या जात आहेत. महाराष्ट्र सरकारप्रमाणे समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनीही दहा रुपयांमध्ये (Meals for 10 rupees) गरिबांना थाळी (Shivabhojan thali) देण्याची घोषणा केली आहे. सोबतच त्यांनी मोठ्या घोषणा केल्या. (Akhilesh Yadav announces Shivbhojan Thali)

निवडणुका म्हटल्या की प्रचार करणे व मतदारांना प्रलोभन देणे आलेच. निवडणुकीत आपला विजय व्हावा यासाठी लोकांना कोणत्याही प्रकारे आपल्याकडे आकर्षित करण्याचा नेत्यांचा व पार्टीचा प्रतत्न असतो. गरिबांना मोफत धान्य असो, शेतकऱ्यांसाठी ५० टक्के वीज बिलात सवलत असतो किंवा अन्य कोणतेही गोष्ट... याद्वारे मतदाराने आपल्याला मत द्यावे याचा प्रयत्न केला जातो.

Akhilesh Yadav announces Shivbhojan Thali
मटण खाल्ल्यानंतर हे पदार्थ खाणे टाळा; अन्यथा या परिणामांना तयार राहा

तसेच निवडणुकीत प्रत्येक पक्षाकडून जाहीरनामा काढला जातो. याद्वारे पक्षाद्वारे कोणते कार्य केले जाणार याची माहिती दिली जाते. याद्वारे म्हणा किंवा अन्य कोणत्या कारणाने मतदार आपले मत वेगवेगळ्या पक्षाला देत असतो. हेच लक्षात घेऊन समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी गरिबांना दहा रुपयांत जेवण देण्याची घोषणा (Shivabhojan thali) केली आहे.

अखिलेश यादव यांनी आपल्या भाषणात सोशल कँटीन, किराणा दुकान उघडणार असल्याचे सांगितले आहे. अखिलेश यादव यांनी शनिवारी (ता. २९) मोठ्या घोषणा केल्या. राज्यात समाजवादी पक्षाचे सरकार आल्यास सोशल कॅंटीन सुरू केले जातील. हे कँटीन गरीब लोकांसाठी असतील. तसेच तेथे किराणा दुकानही उघडले जातील. सोशल कँटीनमध्ये नागरिकांना १० रुपयांच्या (Meals for 10 rupees) थाळीनुसार जेवण (Shivabhojan thali) दिले जाणार आहे. यासोबतच त्यांचे सरकार भाव धरणाचे धोरणही राबवणार असल्याचे अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी सांगितले.

Akhilesh Yadav announces Shivbhojan Thali
नंदुरबार : गांधीधाम-पुरी एक्सप्रेसच्या दोन डब्यांना आग

महाराष्ट्रात शिवभोजन थाळी लोकप्रिय

महाराष्ट्रात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेकडून शिवभोजन थाळीची (Shivabhojan thali) घोषणा करण्यात आली. याअंतर्गत गरिबांना फक्त दहा रुपयांत पोटभर जेवण मिळू लागले. कोरोना काळात ही थाळी गरिबांसाठी निःशुल्क होती, हे विशेष... यामुळे गरिबांची जेवणाची चांगलीच सोय झाली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com