

Lamborghini crash in Kanpur leads to arrest after CCTV check
Esakal
कानपूरमधील लंबोर्गिनी अपघात प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी शिवम मिश्राला अटक केलीय. त्याला आज न्यायालयात हजर केलं जाईल. ८ फेब्रुवारीला कोट्यवधि रुपयांच्या किंमतीच्या लंबोर्गिनी कारने व्हिआयपी रोडवर भरधाव वेगात अनेक गाड्यांना धडक दिली. पोलिसांनी सुरुवातीचा तपास आणि सीसीटीव्ही फूटेज तपासल्यानंतर शिवम मिश्राच गाडी चालवत होता असे संकेद दिले आहेत. मात्र त्याच्या वकिलांकडून चालक गाडी चालवत होता असा दावा करण्यात आलाय.