
योगगुरू पद्मश्री शिवानंद बाबा यांचे शनिवारी रात्री वयाच्या १२८ व्या वर्षी वाराणसी येथे निधन झाले. बीएचयू रुग्णालयातील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, योगगुरूंनी रात्री ८.३० वाजता उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना तीन दिवस बीएचयूमध्ये दाखल करण्यात आले होते, निधनानंतर रात्री उशिरा त्यांचे पार्थिव दुर्गाकुंड येथील आश्रमात आणण्यात आले.