शिवोली ते पणजी हिंदू चेतना यात्रा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 18 मे 2018

गोवा - गोव्यात सुरू असलेल्या ख्रिस्ती धर्मांतरणविरोधात सर्व हिंदू संघटना गोमंतक हिंदू प्रतिष्ठानखाली एकवटल्या आहेत. या धर्मांतरणाला विरोध करण्यासाठी व निषेध नोंदविण्यासाठी येत्या रविवारी 20 मे रोजी रोजी दुचाकी व चारचाकी वाहने घेऊन शिवोली ते पणजी अशी हिंदू चेतना यात्रा काढण्यात येणार आहे. 

या यात्रेला आव्हान म्हणून बिलिव्हर्स अनुयायींनी देखील 23 मे रोजी रॅली आयोजित केली आहे. या रॅलीचा निषेध करण्यात येत आहे. या धर्मांतरणामुळे गोव्यातील अनेक हिंदू कुटुंबामध्ये फूट तसेच कलह निर्माण झाले आहेत. या प्रकारामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाल्यास त्याला सरकार जबाबदार असेल. या धर्मांतरणामुळे राज्यात हिंदू समाजासमोर धोक्याची घंटा निर्माण झाली आहे. त्यामुळे याला वेळीच आळा घालण्यासाठी हिंदू समाजाने मोठ्या संख्येने या यात्रेत सामील होण्याचे आवाहन गोमंतक हिंदू प्रतिष्ठानचे अध्यक्ष शैलेंद्र वेलिंगकर यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केले आहे.

Web Title: Shivoli to Panaji Hindu Chetna Yatra