अखिलेश हेच मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार - शिवपालसिंह

यूएनआय
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

लखनौ - समाजवादी पक्षाची बहुचर्चित बैठक आज पक्षाध्यक्ष शिवपालसिंह यादव यांच्यासोबत झाली; या बैठकीत शिवपालसिंह यांनी अखिलेश हेच मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार राहतील, असे म्हटले आहे. अपेक्षेप्रमाणे मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि समाजवादी पक्षप्रमुख मुलायमसिंह यादव यांनी मात्र या बैठकीकडे पाठ फिरविली.

शिवपालसिंह यांनी बैठकीत पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांनी 2017 मधील निवडणुकांसाठी तयारीस लागण्याच्या सूचना केल्या. सूत्रांच्या माहितीनुसार, बंधू मुलायमसिंह आणि पुतण्या अखिलेश यांना या बैठकीसाठी आमंत्रण देण्यास शिवपाल स्वत: गेले होते; परंतु पक्षातील वातावरण सध्या फार चांगले नसल्याचे कारण पुढे करत संबंधितांनी ही बैठक टाळल्याचे समजते.

आज शिवपालसिंहांनी सत्तेत आल्यास अखिलेशच मुख्यमंत्री असल्याचे सांगितल्याची माहिती या बैठकीला उपस्थित एका नेत्याने दिली. परंतु, मुलायम यांनी नवनिर्वाचित आमदार याबाबतचा निर्णय घेतील, असे म्हटले असल्याने कार्यकर्त्यांत द्विधामनस्थिती आहे. या नेत्याने दिलेल्या माहितीनुसार बैठकीला मोबाईल फोन्स घेऊन जाण्यास मनाई होती. या बैठकीत शिवपाल यांनी कार्यकर्त्यांना पाच नोव्हेंबरला होणाऱ्या पक्षाच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाचीही तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Web Title: shivpalsinh asked akhilesh is the chief minister candidate