लव्ह जिहाद कायद्याच्या घोषणेनंतर मध्यप्रदेशात आता काऊकॅबिनेट; CM शिवराज सिंह चौहान यांची घोषणा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 18 November 2020

मध्य प्रदेश राज्यात याआधी कथित लव्ह जिहादच्या विरोधात कायदा करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

भोपाळ : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बुधवारी राज्यात गौ कॅबिनेट बनवण्याची घोषणा केली आहे. गौ कॅबिनेट राज्यात गायींचं संरक्षणाच्या दिशेने काम करेल. चौहान यांनी म्हटलंय की, या कॅबिनेट अंतर्गत सात विभाग सामिल असणार आहेत. त्यामध्ये पशुपालन, वन, पंचायत, ग्रामीण विकास, गृह, राजस्व आणि किसान कल्याण विभाग असे सात विभाग समाविष्ट असणार आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी म्हटलंय की, गौ कॅबिनेटची पहिली बैठक गोपाष्टमी दिवशी म्हणजेच 22 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता गौ अभ्यारण सालरिया आगर मालवामध्ये होईल. 

शिवराज सिंह चौहान यांनी ट्विट केलंय की, मध्य प्रदेशमध्ये गोधन संरक्षण आणि संवर्धनासाठी 'गौकॅबिनेट' बनवण्याचा निर्णय घेतला आहे. पशुपालन, वन, पंचायत आणि ग्रामीण विकास, राजस्व आणि गृह आणि किसान कल्याण विभाग असे विभाग गौ कॅबिनेटमध्ये सामिल असतील. पहिली बैठक 22 नोव्हेंबर रोजी गोपाष्टमी दिवशी दुपारी 12 वाजता अभ्यारण, आगर मालवामध्ये आयोजित केली जाईल. 

हेही वाचा - निष्क्रीय राहून बोलणं म्हणजे आत्मपरिक्षण नसतं; अधिर रंजन चौधरींची कपिल सिब्बल यांच्यावर टीका

मध्य प्रदेशात भाजपाचे सरकार आहे. मध्य प्रदेश राज्यात याआधी कथित लव्ह जिहादच्या विरोधात कायदा करण्याची घोषणा करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्र यांनी आगामी विधानसभा सत्रामध्ये लव्ह जिहादच्या विरोधात कायदा करण्याची घोषणा केली आहे. मंत्र्यांनी म्हटलंय की, हा अजामिनपात्र गुन्हा असेल तसेच या कायद्याअंतर्गत दोषींना पाच वर्षांपर्यंत शिक्षेची तरतुद असेल. याआधी भाजपचेच सरकार असणाऱ्या उत्तर प्रदेशातदेखील या मुद्यावरुन कायदा बनवण्याची हालचाल दिसून आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivraj singh chouhan announces formation of cow cabinet in state first meeting madhya pradesh chief minister