Shivraj Singh Chouhan: औषधाच्या चिठ्ठीवर पहिल्यांदा लिहायचं 'श्री हरि', गोळ्यांची नावंही हिंदीतच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shivraj Singh Chauhan

Shivraj Singh Chouhan: औषधाच्या चिठ्ठीवर पहिल्यांदा लिहायचं 'श्री हरि', गोळ्यांची नावंही हिंदीतच

Shivraj Singh Chouhan : मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे त्यांच्या अजब वक्तव्यासाठी ओळखले जाणारे राजकीय वक्ते आहेत. सध्या ते अशाच एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहे. यावेळी त्यांनी केलेलं ते वक्तव्य मात्र सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी गांभीर्यानं घेतले आहे. मध्यप्रदेशमध्ये आता एमबीबीएसचा अभ्यासक्रम हा आता हिंदीमध्ये सुरु करण्यात आला आहे. त्यानिमित्तानं आयोजित हिंदी विमर्श कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी ते वक्तव्य केले आणि ट्रोल झाल्याचे दिसून आले आहे.

शिवराज म्हणाले, तुम्हाला कदाचित एक गोष्ट माहिती नसेल ती म्हणजे रशिया, जपान, जर्मनी आणि चीनमध्ये इंग्रजीला कुणी जास्त विचारत नाही. त्यांची भाषा ही केव्हाच विज्ञानभाषा झाली आहे. आपल्याकडे मात्र सर्रास इंग्रजीचा वापर केला जातो. बऱ्याचशा विषयांचे शिक्षण हे इंग्रजीमध्ये आहे. अशावेळी दुसरा काही ऑप्शन नसतो. आम्ही मोठ्या प्रयत्नानं एमबीबीएसमधील शिक्षण हे आता हिंदीमध्ये आणले आहे. संपूर्ण अभ्यासक्रम हा हिंदी भाषेमध्ये असणार आहे. आपणच इंग्रजीचे गुलाम झाले आहोत हे लक्षात घेण्याची गरज आहे.

शिवराज यांचे भाषण ऐन रंगात आल्यावर त्यांनी जमलेल्या डॉक्टरांकडे पाहत एक वक्तव्य केले. ते म्हणजे, त्यांनी यापुढे आपल्या चिठ्ठीवर आरएक्स असे न लिहिता श्री हरि लिहावे. त्यानंतर क्रोसिन असे लिहायचे झाल्यास ते ही हिंदीतच लिहायचे. असे त्यांनी सांगितल्यावर अनेकांनी त्यांना हसून दाद दिली. सोशल मीडियावर मात्र सिंह यांचे ते वक्तव्य चर्चेत आले आहे. अनेकांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. हिंदीमध्ये औषधांची नावं लिहिण्यात कसला आलाय कमीपणा, डॉक्टरांनी औषधांची नावं हिंदीतून द्यावी.

हेही वाचा: Bigg Boss 16: 'तुझ्या अंतर्वस्त्राची... अन् तू किती वेळा...'? साजिदनं राणीला विचारले 'ते' प्रश्न

मी तुम्हाला सांगतो अनेक विद्यार्थ्यांना डॉक्टर होण्याची इच्छा असते. मात्र केवळ इंग्रजीची भीती म्हणून त्यांना त्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येत नाही. अशावेळी आपल्या भाषेतून त्यांना शिक्षण घेता येणं ही मोठी बाब आहे. आता मध्यप्रदेश सरकारानं हिंदी मेडिकलची सुरुवात केली आहे. हा एक आमच्यासाठी महत्वांकाक्षी प्रकल्प होता. जो आता सुरु झाला आहे. हिंदीतून एमबीबीएस अभ्यासक्रमाची निर्मिती करणारं मध्यप्रदेश हे पहिले राज्य असल्याचे शिवराज यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा: Viral Video: हत्तीचा नाद केला, वाघ पळून गेला!