
Bigg Boss 16 Controversy: टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये आपल्या आगळ्या वेगळ्या विषयानं आणि सादरीकरणानं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेण्यात बिग बॉसचा हात कुणीही धरु शकत नाही. गेल्या काही वर्षांपासून या रियॅलिटी शो ने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्याचा प्रत्येक सीझन हा कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत असतो. यंदाच्या सीझनमध्ये बिग बॉसच्या घरात आलेल्या निर्माता आणि दिग्दर्शक साजिद खानवरुन मोठा वाद समोर आला आहे. त्यानं अभिनेत्री, मॉडेल राणीला विचारलेल्या त्या तऱ्हेवाईक प्रश्नांची चर्चा सुरु झाली आहे.
काही दिवसांपूर्वी राणीनं साजिदला बिग बॉसच्या घरात घेतलेच कसे हा प्रश्न करुन आपल्यावरील मी टू च्या आरोपांविषयी सांगितले होते. तिच्या त्या पोस्टची चर्चा झाली होती. एकीकडे दिल्लीच्या वुमन्स अँड चाईल्ड कमिटीनं देखील बिग बॉसच्या निर्मात्यांना साजिदला त्या शोमधून बाहेर काढा अशी लेखी पत्राव्दारे मागणी केली होती. त्यामुळे येत्या काळात साजिदबाबत बिग बॉसचे निर्माते एखादा महत्वाचा निर्णय घेणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अभिनेत्री शर्लिननं देखील साजिदवर भयंकर आरोप करुन खळबळ उडवून दिली होती.
यासगळ्यात साजिदसमोरच्या अडचणीत वाढ झाली आहे. भोजपूरी अभिनेत्री राणी चॅटर्जीनं केलेल्या आरोपांनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. राणीनं म्हटलं आहे की, साजिदनं मला घरी बोलावून माझ्याशी असभ्य वर्तन केले होते. आणि मला नको ते प्रश्न विचारले होते. त्यातील अनेक प्रश्न हे माझ्या लैंगिक आयुष्य़ाशी संबंधित होते. असा खुलासा राणीनं केला आहे. त्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. आतापर्यत अनेक अभिनेत्रींनी साजिदबद्दल वेगवेगळे खुलासे करुन त्याच्याविषयी नाराजी व्यक्त केली आहे.
मी टू च्या आरोपांमुळे साजिदची बिग बॉसच्या घरातील प्रवास हा आता काहीच दिवसांचा असणार की काय अशी शंका नेटकऱ्यांना येऊ लागली आहे. दुसरीकडे त्याची बाजूनं बोलणाऱ्यांचीही काही कमी नाही. यासगळ्यात अभिनेत्री राखी सावंत आघाडीवर आहे. तिनं साजिदवर केलेल्या आरोपांचे खंडन केले आहे. मात्र आता सोशल मीडियावरुन नेटकऱ्यांनी साजिद सारख्याला बिग बॉस सारख्या प्लॅटफॉर्म मिळायला नको. अशी प्रतिक्रिया दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.