काश्मीरच्या निर्णयानंतर बाळासाहेबांचा व्हिडिओ व्हायरल

वृत्तसंस्था
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

बाळासाहेबांना पंतप्रधान झाल्यानंतर पहिले काम काय करणार, असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी उत्तर दिले, की काश्मीर साफ करण्याचे पहिले काम करणार. काश्मीरमध्ये एकही पाकिस्तान किंवा बांगलादेशचा नागरिक राहता कामा नये. दहशतवाद्यांवर खटले न चालविता थेट त्यांना शूट करण्याचे आदेश देईल.

मुंबई : जम्मू काश्मीरमधील कलम 370 कलम हटविण्याचा प्रस्ताव मांडण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

शिवसेनेने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून बाळासाहेबांच्या मुलाखतीचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये बाळासाहेबांना पंतप्रधान झाल्यानंतर पहिले काम काय करणार, असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी उत्तर दिले, की काश्मीर साफ करण्याचे पहिले काम करणार. काश्मीरमध्ये एकही पाकिस्तान किंवा बांगलादेशचा नागरिक राहता कामा नये. दहशतवाद्यांवर खटले न चालविता थेट त्यांना शूट करण्याचे आदेश देईल.

जम्मू काश्मीरचे द्विविभाजन करण्याचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मांडला आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश होणार आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी आज (सोमवार) राज्यसभेत याबाबत प्रस्ताव मांडला. जम्मू-काश्मीरच्या पुनर्रचनेचा प्रस्ताव आम्ही मांडला आहे. कलम 370 मधील काही कलम वगळण्यात येणार असून, संसदेत कायदा झाल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरीनंतर नवे नियम लागू होतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena chief Balasaheb Thackeray video viral after article 370 decision