...तर भाजपला बांबूंचा कारखाना काढायला लागेल : संजय राऊत

...तर भाजपला बांबूंचा कारखाना काढायला लागेल : संजय राऊत

पंढरपूर : भाजपमध्ये वाचाळवीरांची संख्या अधिक आहे. अनेक दिवसांपासून काही नेते पक्षाला चर्चेत ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक वादग्रस्त वक्तव्य करत आहेत, असे सांगत यापुढे भाजपने राम मंदिराचा मुद्दा घेऊ नये, राम मंदिर बांधण्यासाठी शिवसेना समर्थ आहे, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज (शनिवार) येथे सांगितले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सोमवारी पंढरपूर येथे जाहीर सभा होणार आहे. सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या तयारीची पहाणी करण्यासाठी खासदार राऊत आज पंढरपुरात आले होते. पाहणीनंतर खासदार राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर राम मंदिर प्रश्नावरून पुन्हा टीकास्त्र सोडले. 

खासदार राऊत म्हणाले, "शिवसेना कधी भूतकाळाचा विचार करत नाही. भविष्यकाळ आणि वर्तमानकाळाचा विचार करून वाटचाल सुरू आहे. अयोध्येनंतर प्रथमच उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर उभारणीसाठी पंढरपुरात सभा घेतली आहे. राम मंदिराचा मुद्दा शिवसेनेने घेतल्यानंतर भाजप नेते हनुमानाची जात काढून सामाजिक विषमता निर्माण करू लागले आहेत. अलीकडेच भाजप नेते नितीन गडकरी यांनीच पक्षातील वाचाळवीरांच्या तोंडात बांबू घालण्याची वेळ आल्याची आहे सांगितले आहे. त्यामुळे भाजपला बांबूचा कारखाना काढावा लागेल''.

दरम्यान, शिवसेनेने राष्ट्रीय स्तरावर आपली नवी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. उत्तरप्रदेशनंतर शिवसेनेने महाराष्ट्रात प्रथमच मेळावा घेतला आहे. भाजप हा राष्ट्रीय पक्ष राहिला नसून, तो आंतरराष्ट्रीय पक्ष झाला आहे, अशी खिल्लीही खासदार राऊत यांनी उडवली. पंढरपुरातील सभेनंतर उद्धव ठाकरे यांना अनेक राजकीय नेते भेटणार आहेत. यावेळी काही नेत्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश होईल असेही राऊत यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com