शिवसेनेच्या अरविंद सावंत यांचा 'कॅबिनेट' मंत्रिमंडळात समावेश

arvind sawant
arvind sawant

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेट मंत्रिमंडळात शिवसेनेचा कोणता खासदार असेल हे चित्र आता स्पष्ट झाले आहे. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत हे आज शपथ घेतील हे आता स्पष्ट झालं आहे. आज (ता. 30) सकाळी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष शहा यांचा फोन आल्याचे समजते. अमित शहा यांनी सावंत यांना संध्याकाळी 5 वाजता पंतप्रधान कार्यालयात येण्याचं निमंत्रण दिले. यामुळे आज संध्याकाळी अरविंद सावंत हे मंत्रीपदाची शपथ घेणार हे निश्चित समजले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा पंतप्रधान पदाची शपथ घेत आहेत. राष्ट्रपती भवनात सांयकाळी 7 वाजता शपथविधी सोहळ्याचा हा दिमाखदार कार्यक्रम पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी काही खासदांराना केंद्रीय मंत्री म्हणूनही शपथ देण्यात येणार आहे.यामध्ये शिवसेचे दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांचादेखील समावेश असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. 

शिवसेना नेते संजय राऊत यांनी ही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. शपथविधीसाठी अरविंद सावंत भल्या पहाटे आपल्या कुटुंबासह दिल्लीला रवाना झाले आहेत. तसेच शपथविधी सोहळ्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कुटुंबासहित उपस्थित राहणार आहेत.

अरविंद सावंत यांची वर्णी का?

आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन कॅबिनेट मंत्री पद हे मुंबईत असावं अशी शिवसेनेची रणनीती आहे.अरविंद सावंत हे दक्षिण मुंबईतुन खासदार आहेत.दक्षिण मुंबईमधून काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांना एक लाखापेक्षा अधिक मतांनी पराभूत करून सावंत हे दुसऱ्यांदा खासदार झाले आहेत.अरविंद सावंत यांना सर्वोत्कृष्ट संसदपटू म्हणून व संसदेत सर्वात जास्त उपस्थिती असलेले खासदार म्हणून गौरवण्यात आले आहे.

आज गुरुवारी पंतप्रधानांसह महत्वाच्या कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी होईल. मागील मंत्रिमंडळात शिवसेनेचा केवळ एक मंत्री होता.मात्र यंदा किमान २ मंत्रिपदे शिवसेनेला दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.शिवसेनेच्या वतीने अनिल देसाई, भावना गवळी, विनायक राऊत, राहुल शेवाळे यांची नावे ही चर्चेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com