esakal | 'हमाम में सब नंगे होते है।', फडणवीसांच्या पत्रकार परिषदेनंतर राऊतांची प्रतिक्रिया
sakal

बोलून बातमी शोधा

'हमाम में सब नंगे होते है।', फडणवीसांच्या पत्रकार परिषदेनंतर राऊतांची प्रतिक्रिया

फडवणीस यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन सचिन वाझे प्रकरणी पुन्हा काही प्रश्न उपस्थित केले आहेत. सचिन वाझे हे वसुली एजंट असल्याचा आरोप फडवणीस यांनी पत्रकार परिषदेत केला होता.

'हमाम में सब नंगे होते है।', फडणवीसांच्या पत्रकार परिषदेनंतर राऊतांची प्रतिक्रिया

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सचिन वाझे प्रकरण चांगलच गाजतंय. याप्रकरणावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असून, राज्यातील विरोधी पत्र भाजपने हा विषय उचलून धरला आहे. राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली असून, विधानसभेत आणि सभागृहाबाहेर सरकारला प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. आज, फडवणीस यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन सचिन वाझे प्रकरणी पुन्हा काही प्रश्न उपस्थित केले आहेत. सचिन वाझे हे वसुली एजंट असल्याचा आरोप फडवणीस यांनी पत्रकार परिषदेत केला होता. त्याचबरोबर मनसुख हिरेन यांची हत्या कशी झाली? घटनाक्रम काय होता? उपलब्ध पुरावे काय आहेत. याची माहिती फडवणीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यांच्या पत्रकार परिषदेनंतर, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सायंकाळी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी फडणवीस यांचे आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला. फडणवीस सांगतायत तसं जर घडलं असले तर ते खूपच गंभीर आहे, असं मत राऊत यांनी व्यक्त केलं.

हे वाचा - मुंबई पोलीस दल कठिण परिस्थितीतून जात आहे - हेमंत नगराळे

संजय राऊत काय म्हणाले?
संजय राऊत यांनी सायंकाळी दिल्लीतील निवासस्थानाबाहेर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, 'विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद मी पाहिली. ते सत्यापासून फारकत घेत आहेत, असं माझं मत आहे. वाझे यांना यापूर्वी कोणत्या प्रकरणात निलंबित करण्यात आलं, हे त्यांना चांगलं माहिती आहे. 

भाजपची सत्ता असलेल्या राज्यात यापेक्षा मोठे प्रकार घडले आहेत. आम्ही त्यात कधीच हस्तक्षेप केला नाही. एनआयए आणि एटीएस दोन्ही संस्था तपास करत आहेत. त्यांचे अहवाल, समोर येऊ द्यात मगच आपण यावर बोलू शकतो. सचिन वाझे वसुली एजंट असल्यासारखं काम करत होते, असा आरोप फडवणीस यांनी केलाय. माझं असं मत आहे की, राजकारणात असा आरोप कोणी करू नये. कोणाच्या राज्यात कोण वसुली करत होतं आणि वसुली इंचार्ज कोण आहे. हे सगळ्यांना सगळं माहिती असतं. 'हमाम में सब नंगे होते है|' या संपूर्ण प्रकरणानंतरही सरकारच्या केसालाही धक्का लागणार नाही, असं राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं.

हे वाचा - हेमंत नगराळे मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त, परमबीर सिंह यांना हटवलं

मुंबईच्या पोलिस आयुक्तपदावरून परमबीर सिंह यांना हटवल्यानंतर त्यांच्या जागी हेमंत नगराळे यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी म्हटलं की, मुंबईसह महाराष्ट्र पोलिस दलाला नवीन नेतृत्व मिळालं आहे. खाकी वर्दीची शान राखली जाईल अशी अपेक्षा आहे. 

loading image