आता वेळ जवळ आली, आज पवारांना भेटणार : संजय राऊत

Shivsena MP Sanjay Raut speaks about Maharashtra Government Formation in PC
Shivsena MP Sanjay Raut speaks about Maharashtra Government Formation in PC

नवी दिल्ली : 'काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची काल (ता. 20) झालेली बैठक ही किमान समान कार्यक्रमावरच झाली. पुढील एक ते दोन दिवसांत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे तिनही पक्ष अंतिम निर्णयापर्यंत पोहोचतील व डिसेंबर महिना सुरू होण्याच्या आत सरकार स्थापन होईल. तसेच शिवसेनेच्या नेतृत्वातच सरकार स्थापन होईल,' असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

'शरद पवारांशी काल भेटून पुढील चर्चा होणार होती, मात्र आज त्यांची भेट नक्की होईल व पुढील निर्णयांवर विचार केला जाईल. काँग्रेसचे बैठकीला आलेले सर्व नेते सोनिया गांधींना सर्व माहिती देत आहेत, त्यामुळे त्यांच्या भेटीचे नियोजन नाही. यापुढील महत्त्वाच्या बैठका या मुंबईत होतील, त्यामुळे सर्व पत्रकारांनी आता मुंबईला जावे,' असेही राऊत यांनी यावेळी सांगितले. 

राष्ट्रवादीला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद हवे आहे, अशी माहिती मिळेते, असा सवाल पत्रकारांनी केला असता, राऊत म्हणाले की, अशा खोट्या बातम्या वारंवारपणे पसरवल्या जात आहेत. त्यावर विश्वास ठेवू नका. महाराष्ट्रात सरकारा स्थापन होऊ नये असे ज्यांना वाटते, तेच लोक अशा बातम्या पसरवत आहेत, असे उत्तर राऊत यांनी दिले.  

शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले यावर माध्यमांनी सवाल केला असता, राऊत म्हणाले की, देशाच्या पंतप्रधानांना कोणीही जाऊन भेटू शकते, त्याप्रमाणे शरद पवार व गृहमंत्री अमित शहा मोदींना भेटले. यातून वेगळा अर्थ काढू नये. आमची उद्धव ठाकरेंशी प्रत्येक मुद्यावर चर्चा होते व त्यांच्या मतांनुसारच निर्णय घेतले जातात.

राज्यसभेतील जागा बदलण्यामध्ये नक्कीच राजकीय दबाव आहे. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचे पडसाद राज्यसभेतही उमटत आहेत. निदान राज्यसभेची प्रतिष्ठा राखण्यासाठी तरी असा दबाव आणू नये. राजकारण वेगळे आणि राज्यसभेचा सन्मान वेगळा, असेही राऊतांनी यावेळी सांगितले. 

संजय राऊत म्हणतात, हम बुरे ही ठीक है
संजय राऊत यांनी आज सकाळी ट्विट करत म्हटले आहे, की हम बुरे ही ठीक है, जब अच्छे थे तब कौनसा मेडल मिल गया था. असे म्हणून त्यांनी भाजपला अप्रत्यक्षरित्या टोला हाणला आहे. भाजप आणि शिवसेना यांच्यात काडीमोड झाल्याचे जवळपास स्पष्ट असून, आता आम्ही वाईट आहोत तेच बरे आहे, असे राऊत यांचे म्हणणे आहे. आगोदर कुठे आम्हाला मेडल मिळाले होते, असेही त्यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com