esakal | संजय राऊत म्हणतात, हम बुरे ही ठीक है
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut

संजय राऊत यांनी आज सकाळी ट्विट करत म्हटले आहे, की हम बुरे ही ठीक है, जब अच्छे थे तब कौनसा मेडल मिल गया था. असे म्हणून त्यांनी भाजपला अप्रत्यक्षरित्या टोला हाणला आहे.

संजय राऊत म्हणतात, हम बुरे ही ठीक है

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यातील आघाडीचे जवळपास ठरले असताना आज (गुरुवार) शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा ट्विट करून भाजपला चिमटा काढला आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

संजय राऊत यांनी आज सकाळी ट्विट करत म्हटले आहे, की हम बुरे ही ठीक है, जब अच्छे थे तब कौनसा मेडल मिल गया था. असे म्हणून त्यांनी भाजपला अप्रत्यक्षरित्या टोला हाणला आहे. भाजप आणि शिवसेना यांच्यात काडीमोड झाल्याचे जवळपास स्पष्ट असून, आता आम्ही वाईट आहोत तेच बरे आहे, असे राऊत यांचे म्हणणे आहे. आगोदर कुठे आम्हाला मेडल मिळाले होते, असेही त्यांनी म्हटले आहे.

नव्या आघाडीचं ठरलं!

संजय राऊत हे सध्या दिल्लीत आहेत. बुधवारी रात्री आघाडीतील पक्षांची बैठक झाल्यानंतर राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी एकमत झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे राज्यात महाशिवआघाडी सरकारचा मार्ग मोकळा झाला आहे. आज पुन्हा दिल्लीत बैठका होणार असून, उद्या (शुक्रवार) शिवसेना आमदारांच्या बैठकीनंतर महाशिवआघाडीच्या अधिकृत घोषणेची शक्यता आहे. 

केंद्रीय पथक पाहणीसाठी येणार राज्याच्या दौऱ्यावर