कोंबडी आणि अंड्याला शाकाहारीचा दर्जा द्या : संजय राऊत

वृत्तसंस्था
मंगळवार, 16 जुलै 2019

राज्यसभेत सोमवारी आयुर्वेदावर चर्चा सुरु असताना त्यांनी ही मागणी केली आहे. यावेळी राऊत यांनी ही मागणी करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. तसेच राऊत यांनी काही उदाहरणे देत आयुष मंत्रालयाने या गोष्टीची दखल घेतली पाहिजे आणि हे नक्की केले पाहिजे की हे अंडे शाकाहारी आहे की मांसाहारी.

नवी दिल्ली : अंडे शाकाहारी की मांसाहारी हा वाद सुरु असताना आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अंडे व कोंबडी यांनी शाकाहारीचा दर्जा देऊन टाका, अशी मागणी केली आहे. 

राज्यसभेत सोमवारी आयुर्वेदावर चर्चा सुरु असताना त्यांनी ही मागणी केली आहे. यावेळी राऊत यांनी ही मागणी करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. तसेच राऊत यांनी काही उदाहरणे देत आयुष मंत्रालयाने या गोष्टीची दखल घेतली पाहिजे आणि हे नक्की केले पाहिजे की हे अंडे शाकाहारी आहे की मांसाहारी.

संजय राऊत म्हणाले, की मी एकदा महाराष्ट्रातल्या नंदुरबारमध्ये गेलो होतो. नंदुरबार हा आदिवासी जिल्हा आहे, तिथल्या काही आदिवासी बांधवांनी मला जेवणाचं ताट आणून दिले. मी त्याला विचारलं काय आहे जेवणात? तर तो म्हटला ही कोंबडी आहे. मी म्हटलं मला कोंबडी नको, तर तो म्हटला ही आयुर्वेदीक कोंबडी आहे जी तुम्ही खाल्लीत तर तुमच्या शरीरात जर काही आजार असतील तर ते बरे होऊ शकतात. आम्ही या कोंबडीचे पालनपोषणच अशा रितीने करतो की ती आयुर्वेदीक कोंबडी म्हणूनच वाढवली आहे. आयुष मंत्रालयाने याची दखल घेतली पाहिजे. तसेच हरियानातून आलेल्या काही जणांनी आयुर्वेदीक अंडे हा शब्द प्रयोग केला. मी त्यांना विचारलं की अंडे आयुर्वेदीक कसे काय? तर त्यांनी सांगितले की आम्ही पोल्ट्रीतल्या कोंबड्यांना आयुर्वेदीक खाद्य देतो ज्यामध्ये लवंग, मुसली, तीळ अशा जिन्नसांचा समावेश आहे. हे खाणं खाल्ल्यानंतर कोंबड्या जी अंडी देतात ती शाकाहारी आणि आयुर्वेदीक असतात.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivsena MP Sanjay Raut talk about vegetarian egg and Ayurvedic chicken in Rajyasabha